स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक ४-५ महिने होणार नाहीत
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। राज्यात महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका या आणखी चार-पाच महिने होणार नाहीत, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे. ओबीसी आरक्षणाबाबत राज्य शासनाने सांख्यिकी अहवाल तयार करण्यासाठी मागास आरोग्याला निधी, मनुष्य बळ दिले आहे. ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतरच निवडणुका होतील, असेही हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण भागातील कोरोना उपाययोजनांबाबत कोल्हापूर येथे बोलताना ते म्हणाले, राज्यात कोरोना रुग्णसंख्येमध्ये झपाटय़ाने वाढ होत आहे. त्यामुळे दक्षतेचा उपाय म्हणून ग्रामीण भागात प्रत्येक गावात ग्राम समिती पुन्हा कार्यान्वित करण्यात येत आहे. प्रत्येक गावात बाहेरून आलेल्या लोकांची नोंद ठेवली जाईल. ‘केंद्र सरकारने लागू केलेल्या नियमाकलीप्रमाणे राज्य शासनाचे निर्बंध आहेत. नरेंद्र मोदी यांनी दिलेली नियमावली चंद्रकांत पाटील यांना मान्य नसेल, तर आम्ही मोदी यांना तसे कळवू’ असा टोला त्यांनी लगावला.