भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

राज्यात अनलॉक की लॉकडाऊन? 24 तासांनंतरही संभ्रम कायम, मुख्यमंत्री कधी जाहीर करणार निर्णय?

Monday To Monday NewsNetwork।

मुंबई(वृत्तसंस्था)। राज्यात अनलॉक की लॉकडाऊन या प्रश्नावरुन अद्यापही संभ्रम कायम आहे. कारण 24 तास उलटून गेल्यानंतरही राज्य सरकारकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत असून रिकव्हरी दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक जिल्ह्यांत पॉझिटिव्हीटी रेट हा 5 टक्क्यांहून कमी आहे असे जिल्हे संपूर्णपणे अनलॉक करण्याचा निर्णय काल (3 मे 2021) रोजी मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केला. मात्र, त्यानंतर तासाभरातच राज्य सरकारने या निर्णयावरून यू टर्न घेत म्हटलं, राज्यातील निर्बंध हटवण्यात आले नाहीत, नव्या नियमांचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यानंतर विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं उद्या म्हणजेच 4 मे 2021 रोजी मुख्यमंत्री या संदर्भात अधिकृत निर्णय जाहीर करतील. मात्र, 24 तासांनंतरही अद्यापही कुठलाही निर्णय जाहीर न झाल्याने जनतेच्या मनात संभ्रम कायम आहे.

विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र 5 टप्प्यांत अनलॉक करण्याचं जाहीर केलं. पहिल्या टप्प्यात एकूण 18 जिल्हे संपूर्ण पणे अनलॉक करण्याचंही वडेट्टीवारांनी सांगितलं. वडेट्टीवारांच्या या घोषणेनंतर तासाभरातच सरकारने यू टर्न घेतला त्यामुळे नक्की निर्णय आहे तरी काय असा प्रश्न सर्वसामांन्यांच्या मनात आला. या प्रकरणी नागपूर येथे विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री अधिकृत निर्णय जाहीर करतील मात्र, अद्यापही ठाकरे सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने संभ्रम आणखी वाढला आहे.

विजय वडेट्टीवार यांना पत्रकारांनी विचारले की, उद्या राज्यातील 18 जिल्हे अनलॉक होणार की नाही? यावर वडेट्टीवार म्हणाले, 5 टप्प्यांच्या संदर्भात तत्वत: मान्यता मिळाली आहे मात्र, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. यामुळे उद्या अनलॉक होणार की नाही हा गोंधळ अद्यापही कायम आहे आणि राज्यातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात  काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे,या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन  पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात  या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील.अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून  पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!