राज्यातील लॉकडाऊन १ जून नंतर वाढणार .! का शिथिलता देण्यात येणार.
Monday To Monday NewsNetwork।
मुंबई(वृत्तसंस्था)। राज्यातील लॉकडाऊन संदर्भातील राज्य मंत्रिमंडळाची आज बैठकी पार पडली आहे. या बैठकीमध्ये राज्यातील रुग्णसंख्या अजूनही कमी झाली नसल्यामुळे लॉकडाऊन उठवणार की नाही याबाबतची चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि सांगितले की, ‘राज्यातील लॉकडाऊन सरसकट उठवणार नसून त्यामध्ये शिथिलता दिली जाणार आहे.’
‘२१ जिल्ह्यांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटिव्हीटी रेट आहे. त्या अनुषंगाने अशी चर्चा झाली की, ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट जास्त आहे आणि रुग्णदरात वाढ जास्त आहे. त्यामुळे बेट्स उपलब्ध हा प्रश्न त्यानिमित्ताने असतोच. लॉकडाऊनच्या बाबत बेड्स उपलब्धता आणि पॉझिटिव्हीटी रेट हा फार महत्त्वाचा निकष मानला जातो. त्यामुळे एक नक्की आहे की, सरसकट लॉकडाऊन उठवणार हा विषय अजिबात नाही. लॉकडाऊन जो आज आहे, तो तसाच राहून त्याच्यामध्ये शिथिलता देण्यात येणार आहे. मग ती शिथिलता काही तास वाढवण्याची आहे का? जास्त दुकाने उघडण्याची आहे का? हे सगळे जे बारकावे आहेत. त्याची कॅबिनेटमध्ये सविस्तर चर्चा होऊ शकत नाही. पण हा कोरोनाचा नवीन प्रकार व्हेरियंट आहे हे निश्चित आहे. त्या दृष्टीकोनातून तो मुद्दा लक्षात घेऊन किंवा सर्वाधिक कोरोनाबाधित जिल्ह्यांचा मुद्दा लक्षात घेऊन लॉकडाऊन पूर्णपणे उठवणार हा विषय होणार नाही आहे. जो लॉकडाऊन आहे तो वाढवायचा आहे फक्त त्यांच्यामध्ये शिथिलता निश्चित प्रकारे द्यायची आहे. त्या शिथिलतेचे जे बारकावे आहेत, ते बारकावे टाक्स फोर्ससोबत चर्चा करून निश्चित करण्यात येतील. लॉकडाऊनमधील शिथिलता आरोग्य विभाग, टास्क फोर्स आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून केली जाईल,’ अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात कोरोनाचा धोका कमी होत असला तरी म्युकरमायकोसिसचा धोका वाढत आहे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहे. पण आता कोरोनावर मात केल्यानंतर ही इतर आजारांचा धोका वाढत आहे. कोरोनावर मात केल्यानंतर तरुण वर्गामध्ये देखील काही दिवस वेगवेगळे साईड इफेक्ट दिसत आहेत. जे चिंता वाढवणारे आहेत. आज एकदम लॉकडाऊन न उठवता तो १ जूननंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने काही आवश्यक बाबतीत निर्बंध कमी करावे यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यादृष्टीने विभागास निर्देश दिले आहेत.