माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आणखी एक धक्का,मुलगा ऋषीकेश ला ईडीचे समन्स
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई, वृत्तसंस्था। महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात, ईडीने आता अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषीकेश देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. ऋषीकेश देशमुखला आज ११ वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
आज सकाळी ११ वाजता मुंबईतील ईडी कार्यालयात ऋपिकेश देशमुख यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. ईडीचे अधिकारी ऋषिकेश देशमुख यांची कसून चौकशी करतील. यादरम्यान त्यांना विविध प्रश्न विचारतील. त्यांच्याकडून अनेक प्रश्नांचा उलगडा होईल, असे प्रश्न ईडीचे अधिकारी ऋषिकेश यांना विचारतील.
अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या आयोगाकडे परमबीर सिंह यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून माजी न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल यांच्या नेतृत्वात एक सदस्यीय चौकशी आयोगाचं गठन केलं आहे. याच समितीसमोर परमबीर सिंह यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. या प्रतिज्ञापत्रात माझ्याकडे देशमुख यांच्याविरोधात कोणताही पुरावा नाहीय,असं त्यांनी म्हटलंय. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून गायब असणारे देशमुख १ नोव्हेंबर रोजी अचानक ईडी कार्यालयात दाखल झाले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची जवळपास १३ तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना ईडीने त्यांना अटक केली. न्यायालयानेही देशमुख यांना धक्का देत त्यांची रवानगी ईडी कोठडीत ६ नोव्हेंबरपर्यंत केली आहे. म्हणजेच दिवाळीचा संपूर्ण आठवडा त्यांना तुरुंगात काढावा लागणार आहे.