भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई: १३ पिस्तूलांसह ३६ जिवंत काडतुसे जप्त

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,मंडे टू मंडे वृत्तसेवा। घातक शस्त्रांच्या तस्करीप्रकरणी ११ आरोपींना काळाचौकी युनिटच्या एटीएसच्या अधिकार्‍यांनी अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी १३ देशी बनावटीचे हायक्वालिटी पिस्तूल आणि ३६ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. घातक शस्त्रे बाळगल्या प्रकरणी या ११ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या शस्त्रांचा कुठल्या गुन्ह्यांत वापर झाला होता का किंवा होणार होता का? याचा आता पोलीस तपास करीत आहेत.

गेल्या काही दिवसांत इतर राज्यातून घातक शस्त्रे आणून त्याचा वापर विविध गुन्ह्यांत होत असल्याने अशा शस्त्र तस्करांविरुद्ध महाराष्ट्र एटीएसने विशेष मोहीम सुरू केली होती. ही मोहीम सुरू असताना मुलुंड येथून काळाचौकी युनिटच्या अधिकार्‍यांनी एका तरुणाला घातक शस्त्रांसह अटक केली होती. त्याच्या चौकशीतून आलेल्या माहितीनंतर या पथकाने डोंबिवली, उल्हासनगर, उरण आदी आठ ठिकाणी छापे टाकले होते. या कारवाईत पोलिसांनी १३ देशी बनावटीचे पिस्तूल आणि ३६ जिवंत काडतुसे हस्तगत केले आहेत. या सर्वांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

या पिस्तूलचा कुठल्या गुन्ह्यांत वापर झाला आहे का? किंवा कुठल्या गुन्ह्यांत या शस्त्रांचा वापर होणार का? ही शस्त्रे विविध राज्यातून मुंबईत विक्रीसाठी आणली होती. यापूर्वीही त्यांनी अशा शस्त्रांची विक्री केली आहे का? याचा आता पोलीस तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!