भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

महाराष्ट्र गारठला,पुढील तीन दिवस हाडे गोठविणारी थंडी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,वृत्तसंस्था। राज्यातील उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच भागांत तीव्र थंडीची लाट आली असून मराठवाडा आणि नाशिकमध्ये शीतलहर तीव्र झाली आहे.

उत्तर भारतातील अतितीव्र थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्राकडे तीव्र थंड वारे वाहू लागले असून महाराष्ट्रात आणखी तीन दिवस म्हणजे 28 जानेवारीपर्यंत अशीच हाडे गोठविणारी थंडी राहील, असे पुणे वेधशाळेचे हवामानप्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले.

मंगळवारी मुंबईतही अनेक भागात पारा 14 ते 15 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्याचे दिसले. मुंबईतील कडाक्याची थंडी आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचेही डॉ. कश्यपी यांनी सांगितले. विशेषतः पुणे, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या शहरांतील किमान तापमान सरासरीपेक्षा खाली घसरणार आहे.

मंगळवारी सर्वांत कमी 4.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यातील निफाडला झाली, तर पुण्यात या हिवाळ्यातील 8.5 अंश सेल्सिअस असे नीचांकी तापमान नोंदवले गेले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!