भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्रराजकीय

“संजय राऊत यांनी समस्त डॉक्टरांची माफी मागावी”- इंडियन मेडिकल असोसिएशन !

मुंबई (प्रतिनिधी)। डॉक्टरांपेक्षा पेक्षा कंपाउंडर बरे असं अत्यंत अवमानजनक वक्तव्य केल्याबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी समस्त डॉक्टर वर्गाची माफी मागावी अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) महाराष्ट्र शाखेने केली आहे. आयएमए कार्यकारिणीच्या रविवारी झालेल्या बैठकीत राऊत यांनी माफी मागावी या मागणीचा तसेच राऊत यांच्या निषेधाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच राऊतांनी सर्व डॉक्टरांची जाहीर माफी मागावी अशी मागणी भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेशकडूनही करण्यात आली आहे.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असे विधान केले की, ‘डॉक्टरपेक्षा कम्पाऊन्डरला जास्त कळतं”, ”मी तर नेहमी कम्पाऊन्डरकडून औषध घेतो”, ”डब्ल्यूएचओला काय कळतं, सीबीआयसारखंच आहे ते, इकडून तिकडून माणसं गोळा केलेली असतात, डब्ल्यूएचओच्या नादाला लागले म्हणून जास्त कोरोना वाढला” या वक्तव्यामुळे संपूर्ण कोरोना योद्धांचा अपमान झाला आहे. आज कोरोनाच्या संकट काळात डॉक्टर्स हे एक प्रकारे देवदूत म्हणून काम करीत आहेत. एकीकडे महाराष्ट्र सरकारच्या प्रशासन आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रातील समन्वयाचा अभाव असताना देखील राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

डॉ.भोंडवे यांनी सांगितले की राऊत यांनी कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टर आज प्राणाची बाजी लावून काम करताहेत. अशावेळी त्यांचे कौतुक करणे तर सोडाच पण राऊत यांनी डॉक्टरांपेक्षा कम्पाऊन्डरना जास्त कळतं असे म्हणणे निषेधार्ह आहे. डब्ल्यूएचओवरही त्यांनी केलेली टीका अत्यंत अनाठायी आहे. राऊत यांनी देशभरातील डॉक्टरांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी डॉक्टरांची माफी मागावी अशी आमची मागणी आहे.
त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करण्याबाबत आम्ही विचार करीत आहोत. आयएमएच्या राज्यभरातील २१६ शाखांतर्फे राऊत यांच्या निषेधाचे ठराव मंजूर
करून ते राज्यपाल, मुख्यमंत्री आणि राज्यसभा सचिवालयाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहितीही डॉ.भोंडवे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!