महाराष्ट्र अनलॉक होणार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,मंडे टू मंडे वृत्तसेवा। राज्यामध्ये गेल्या महिन्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागण्यात आले होते. मात्र, आता राज्यात बऱ्याच ठिकाणी कोरोनाची संख्या नियंत्रणात आलेली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाचे निर्बंध लवकरच शिथिलता होणार असल्याची शक्यता वक्त केली जात असताना केंद्र सरकारच्या कोविड टास्क फोर्सने निर्देश दिल्यानंतरच राज्यात अनलॉक होणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. यामुळे यासाठी किमान काही आठवडे तरी वाट पहावी लागण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून राज्यातील कोरोनाचे नियम लवकरच शिथिल करणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारयांनी दिली. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते.
सध्या थिएटरमध्ये 50 टक्के उपस्थिती ठेवून सुरू ठेवायला दिलं. इतर कार्यक्रमाला बंधनं आहेत. लग्न समारंभांना बंधन आहेत. सभागृहाची दोन हजार लोकांची कॅपेसिटी असेल तर एक हजार लोकांना परवानगी नाही. फक्त दोनशेलाच परवानगी आहे. त्यामुळे त्यात शिथिलता आणण्याचा प्रयत्न राज्य स्तरावर चर्चा करून घेऊ. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. हळूहळू सर्व नियम हटवण्याची गरज आहे. जोपर्यंत कोरोना संपत नाही. तोपर्यंत सर्वांना मास्क वापरावेच लागेल.असेही अजित पवार म्हणाले आहे.