भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

पोलीस भरतीमध्ये गैरप्रकार; जळगावच्या तरुणाचाही समावेश

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई ,वृत्तसंस्था। ठाण्यात पोलीस भरतीमध्ये गैरप्रकार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे. तर यात जळगावच्या तरुणासह इतर पाच उमेदवारांचा समावेश आहे.

अनिकेत पाटील (वय २५ रा. जळगाव) येथील रहिवासी असुन यासोबतच पाच पोलिस भरती परीक्षार्थीविरुद्ध कलम ४१९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी देवेंद्र बोरसे (वय २८ रा. धुळे), बापू गावडे (वय ४० रा. बारामती), अनिकेत पाटील (वय २५ रा. जळगाव), प्रफुल्ल मंडाले (वय २५ रा. पुणे) आणि मनोज पिंपरे (वय २४ रा. लातूर) या पाचही परीक्षार्थींविरोधात कलम ४१९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ठाण्यातील कापूरबावडी पोलिसांनी रविवारी रात्री याप्रकरणी याबाबतची फिर्याद दाखल केली आहे.

ठाणे शहर आयुक्तालयाच्या पोलीस आस्थापनेवर चालक पदासाठी २६ सप्टेंबर रोजी भरती प्रक्रिया झाली. त्यासाठी ठाणे शहर आणि वागळे इस्टेट या दोन परिमंडळातील ४९ केंद्रांवरील शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली. तब्बल ११ हजार ३८ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. दरम्यान, दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बाळकुम येथील विद्या प्रसारक विद्यालयाच्या केंद्र क्रमांक २१मधील कक्ष क्रमांक पाच मधील देवेंद्र बोरसे, बापू गावडे, प्रफुल्ल मंडाले, मनोज पिंपरे आणि अनिकेत पाटील यांनी पोलीस शिपाई चालक भरती परीक्षेचे नियम, अटी माहिती असतानाही त्याचे उल्लंघन केले.

दरम्यान, आरोपींनी एकमेकांना फायदा होण्यासाठी आपसात संगनमत करून प्रश्नपत्रिकेवर उत्तरांच्या खुणा केल्या. नंतर ही प्रश्नपत्रिका आपसात आदलाबदली केली. हा प्रकार उघड झाल्यानंतर पाचही जणांविरुद्ध रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!