अरबी समुद्रात चक्रीवादळ?महाराष्ट्रात मान्सून काही दिवस लांबणीवर
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जून महिन्यात सुरु होतात पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील फैजपूर, चाळीसगाव परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. तर ढगांच्या गडगडाटासह व गरपीटी सह रावेर, सावदा, फैजपूर परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. नाशिकच्या मालेगावसह शहर परिसरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तसेच वाशिममध्ये पाऊस पडत आहे. अशातच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून येत्या दोन दिवसांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि कोकणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
आज (5 जून, 2023) अरबी समुद्रात चक्रीवादळ स्थिती निर्माण होण्याची शक्यता असून पुढील 48 तासांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्याने त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. म्हणजेच याचा अचूक अंदाज येण्यासाठी आणखी तासभर जावे लागणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले. जर चक्रीवादळ तयार झाल्यास पश्चिम किनारपट्टीला समांतर उत्तरेच्या दिशेने सरकेल. परिणामी चक्रीवादळामुळे किनारपट्टीवर वारे वेगाने वाहतील. वादळामुळे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात किनारपट्टीवर पाऊस पडेल आणि मान्सूनची प्रगती अधिक वेगाने होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दरम्यान, काल 4 जून 2023 पर्यंत मान्सून केरळमध्ये आगमन होणे अपेक्षित होते. पण बदललेल्या वातावरणात मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी किमान 4 ते 5 दिवस लागतील, असा अंदाज आहे. त्यामुळे मान्सून महाराष्ट्रात १० जून पर्यंत दाखल होण्याचा अंदाज आहे , असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.दक्षिण अरबी समुद्रास बंगालच्या उपसागरातील दक्षिण भाग, अंदमान आणि निकोबार बेटापर्यंत पोहोतलेल्या मोसमी वाऱ्यांची वाटचाल संथ सुरु आहे. मोसमी वारे पुढे सरकण्यास पोषक स्थिती नसल्यामुळे दोन दिवस आहे तीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. परिणामी मुंबईसह अनेक उपनगरात 24 तास ढगाळ वातावरण राहणार असून सायंकाळी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, किमान तापमान 34 ते 38 अंश सेल्सिअस राहील.