भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

मंत्रालय बॉम्बने उडवण्याची धमकी; तपासात धक्कादायक कारण आल समोर

Monday To Monday NewsNetwork।

मुंबई(वृत्तसंस्था)।मंत्रालयात बॉम्ब ठेवून मंत्रालय उडवण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे. मंत्रालयात बॉम्ब ठेवून मंत्रालय उडवून देऊ अशी धमकी देणारा ई मेल आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. मात्र धमकी देणारा ई मेल पाठवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पुण्यात घोरपडीमधून अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध मुंबई मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलेश शिंदे असे धमकीचा ई मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. शैलेश यांच्या चौकशीच्या वेळी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्या मुलीचे शाळेचे अँडमिशमन न झाल्याने त्यांनी गृह विभागाला हा धमकीचा मेल केला होता. मुलांचे शैक्षणिक वर्ष हे हॅचिंग शाळेने वाया घालवले आम्हाला न्याय मिळत नाही, असा आरोप शैलेश शिंदे यांच्यासोबतच संतोष पोलकमवार या पालकांनी देखील केला आहे.

धमकीचा मेल मिळाल्यानंतर काल संध्याकाळी मंत्रालायातील सुरक्षा वाढवण्यात आली. डॉगस्कॉडद्वारे मंत्रालयात शोध घेण्यात आला. परंतु मंत्रालयात कोणत्याही प्रकारची स्फोटक वस्तू आढळून आली नाही. धमकीचा ई मेल पाठवणाऱ्या व्यक्तीला शोधण्यासाठी पोलिसांनी महत्त्वाची पाऊले उचलली आणि धमकीचा ई मेल पाठवणाऱ्या शैलेश शिंदे यांना पोलिसांनी पुण्यातून अटक केली.

आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून हा पेपर बाँम्ब होता. असे केल्यानंतर तरी निदान सरकार आम्हाला न्याय देईल की नाही हे आम्हाला माहिती नाही. शिक्षण विभाग,मुख्यमंत्री कार्यालय,मुख्यमंत्र्यांनी तर आम्ही १५० मेल केले.मात्र एकाही मेलचे उत्तर आम्हाला मिळाले नाही. आमच्या मुलांना शिक्षणापासून हॅचिंग शाळेने वंचित ठेवले आहे. आम्ही शिक्षण विभागाकडे तक्रार केली म्हणून आम्हाला शाळेकडून त्रास देण्यात येत आहे. पाचवीपासून शाळा आम्हाला त्रास देत आहे. मुलांना जूनमध्ये पास करण्याऐवजी सप्टेंबरमध्ये पास करण्यात येते. २०१६ पासून हा विचित्र प्रकार शाळेत सुरु असल्याचा आरोप पालक संतोष पोलकमवार यांनी केला आहे. आरोपी शैलेश शिंदे संध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. मंत्रालय उडवण्याची धमकी दिल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर मुंबईच्या मरीन लाईन्स पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुणे पोलिसांकडून त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!