भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीय

मोदी सरकारचा चीनला झटका! ५४ चीनी ॲप्सवर घातली बंदी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन ।

मुंबई,मंडे टू मंडे वृत्तसंकलन। भारताने पुन्हा एकदा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही चीनी ॲप्सवर बंदी घातल्याचे समोर आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक असणाऱ्या ५४ चीनी ॲप्सवर मोदी सरकारने बंदी घातली आहे. माहितीनुसार या बंदी घातलेल्या ॲप्समध्ये Beauty Camera: Sweet Selfie HD, Beauty Camera – Selfie Camera, Equalizer & Bass Booster, CamCard for SalesForce Ent, Isoland 2: Ashes of Time Lite, Viva Video Editor, Tencent Xriver, Onmyoji Chess, Onmyoji Arena, AppLock आणि Dual Space Lite यांसारख्या ॲप्सचा समावेश आहे. मोदी सरकारने सर्वात पहिल्यांदा जून २०२०मध्ये देशातील ॲक्टिव्ह चीनी ॲप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून आतापर्यंत चीनमध्ये तयार झालेले एकूण २२४ ॲप्सवर मोदी सरकारने बंदी घातली आहेत.

जून २०२०मध्ये केंद्र सरकारने ५९ ॲप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. असे पहिल्यांदाच भारतात घडले होते. सरकारने TikTok, UC Browser, Shareit, WeChat सारख्या लोकप्रिय ॲप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर सप्टेंबर २०२०मध्ये ११८ चीनी ॲप्सवर पुन्हा बंदी घातली गेली. मग नोव्हेंबर २०२०मध्ये केंद्र सरकारने ४३ चीनी ॲप्सवर बंदी घातली.

दरम्यान मोबाईल गेम गरेना फ्री फायर (Garena Free Fire) १२ फेब्रुवारीपासून गूगल प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवर दिसत नाही आहे. याचा अर्थ या गेमवरही सरकारने बंदी घातली असेल असा होत आहे. पण सध्या यादीमध्ये ज्या ॲप्सची नावं आहेत, त्यामध्ये या गेमचे नाव दिसत नाहीये. परंतु डाऊनलोडींग प्लेटफॉर्म्सवरून या गेम हटवण्याचे हेच कारण असू शकते का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!