भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

क्रुझ ड्रग्ज प्रकरणात कोणते मंत्री व आमदार संबंधित होते, माझ्याकडे पुरावे असल्याचा मोहित कंबोजचा खडबडजनक दावा

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,मंडे टू मंडे वृत्तसेवा। क्रुझ ड्रग्ज प्रकरणात कोणते मंत्री संबंधित होते?, या संदर्भात माझ्याकडे पुरावे असून मी ते द्यायला तयार आहे, असा दावा करून भाजप नेते मोहित कंबोज यांनी खळबळ उडवून दिली आहे. मुंबईचे नवे पोलिस आयुक्त संजय पांडे हे क्रुझ ड्र्ग्ज प्रकरणाचा नव्याने तपास करणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यावर कंबोज यांनी एक व्हिडिओ ट्विट करत हे आवाहन केले आहे.

मुंबईचे नवे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी क्रुझ ड्रग्ज प्रकरणी एफआयआर दाखल केला पाहिजे. या प्रकरणात जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना सोडता कामा नये. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात बसलेले कोण कोण या प्रकरणात गुंतलेले आहे याची माहिती मी द्यायला तयार आहे, असे कंबोज यांनी म्हटले आहे. मोहित कंबोज हे आपल्या व्हिडिओ ट्विटमध्ये म्हणतात, आज सकाळी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली. मुंबईचे नवे पोलिस आयुक्त संजय पांडे हे क्रुझ ड्रग्ज प्रकरणाशी एनसीबीचे अधिकाऱ्यांचा संबंध आणि तेथे काय भ्रष्टाचार झाला याचा तपास करण्यासाठी एक एसआयटी स्थापन करण्यात आली होती. ती नंतर बंद करण्यात आली. मात्र तिचे काम पुन्हा सुरू केले पाहिजे अशा प्रकारची ती बातमी होती. मी याचे स्वागत करतो. सुनील पाटील, किरण गोसावी यांच्यापासून ते प्रभारकर सैलपर्यंत, मंत्री नवाब मलिक, शिवसेनेचे एक मंत्री आणि नेता आणि काँग्रेसचे मंत्री यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे? परळच्या घटनेचा समन्वय कोणी केला? ज्याच्या चर्चेतून या प्रकरणाशी संबंधित काही माहिती समोर आली असे कोण नेते होते? ही माहिती दाबली गेली. या संदर्भातील सत्य उघड व्हायला हवे. या संदर्भात लोकांपुढे ‘दूध का दूख, पानी का पानी’, व्हायला हवे, असेही कंबोज यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!