भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्याच्या हालचाली

Monday To Monday NewsNetwork।

मुंबई(वृत्तसंस्था)। करोना साथीचा प्रादुर्भाव काहीसा कमी होऊ लागल्याने राज्यात पुढील आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्याचे समजते. निर्बंध कशा पद्धतीने शिथील करण्यात यावेत याचा एक सविस्तर अहवालच टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांना पाठवला असून यावर सखोल चर्चा होऊन टप्प्याटप्प्याने हे निर्बंध हटवण्यात येणार आहेत.हे निर्बंध शिथील करताना पहिल्या टप्प्यात हॉटेल, रेस्टारन्ट आणि दुकानांच्या वेळा वाढवून दिल्या जाणार असल्याच कळते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ७ जुलै रोजी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत महत्वाची बैठक पार पडली होती. त्यानंतर लगेचच ९ जुलै रोजी राज्य आपत्कालीन विभागातील अधिकाऱ्यांसोबतही मुख्यमंत्र्याची बैठक पार पडली. राज्यातील निर्बंध शिथिल करण्यासाठी या दोन बैठकांमध्ये महत्वाची चर्चा झाली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्य टास्क फोर्समधील तज्ञ डाँक्टर आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून निर्बंध शिथिल करण्याबाबत एक सविस्तर अहवाल मागितला होता. राज्यातील पॉझिटीव्हीटी दर, बेडसची संख्या आणि इतर काही निकषांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला असून तो मुख्यमंत्री कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या अहवालावर सविस्तर चर्चा होऊन येत्या आठवड्याभरात निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अहवालातील शिफारशीनुसार राज्यात सर्व आस्थापना टप्प्याटप्प्याने सुरू करताना त्यांची वेळ आणि उपस्थितीची मर्यादाही वाढविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट उघडण्यासाठी सवलती जाहीर केल्या जाणार असल्याचे समजते. यात रेस्टॉरंट सुरु ठेवण्याची वेळ रात्री १० पर्यंत केली जाणार असून ५० टक्क्यांची मर्यादाही काही प्रमाणात शिथील केली जाणार असल्याचे समजते. यासाठी हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण बंधनकारक असेल. तसेच लसीकरण झालेल्या ग्राहकांना रेस्टॉरंटमध्ये प्राधान्याने प्रवेश देण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचे समजते.शक्य असेल तिथे मोकळ्या जागांमध्ये डायनिंगची व्यवस्था करण्याच्या सूचना हॉटेल व्यवसायिकांना दिल्या जाणार असल्याचेही कळते. त्याचबरोबर सध्या दुकाने सुरू ठेवण्यासाठी असलेली वेळही वाढवून दिली जाणार आहे. त्यासाठी दुकानांमधील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण अत्यावश्यक आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!