मत परिवर्तन करण्याची महिलांमध्ये ताकद -ॲड रोहिणी खडसे
मुंबई/मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली, याप्रसंगी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खा सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष आ जयंतराव पाटील, माजी मंत्री आ.जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री म आ.अनिल देशमुख, माजी मंत्री आ.राजेश टोपे, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, प्रदेश सरचिटणीस अदितीताई नलावडे, प्रदेश सरचिटणीस आशाताई भिसे, महिला प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणीताई खडसे, पक्षाच्या नेत्या मुख्य प्रवक्त्या विद्याताई चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, मुंबई विभागीय महिला अध्यक्षा सुरेखाताई पेडणेकर व महिला कार्यालयीन सचिव स्वातीताई माने यांची उपस्थिती होती.
राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणीताई खडसे म्हणाल्या खा सुप्रिया ताई सुळे यांच्या सोबत विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा केला या दौऱ्यात पदाधिकारी, सामान्य नागरिकांचे शरद पवार साहेबांवर असलेले प्रेम अनुभवले ते ऊर्जा देणारे होते. सर्व ठिकाणी मेळाव्यांना स्वयंस्फूर्तीने लोक येत होते आम्हीं पक्षासोबत आहेत आम्हीं शरद पवार साहेबां सोबत आहोत सांगत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हंटला की, पवार साहेब आणि पवार साहेब म्हंटले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे समीकरण कोणीही वेगळं करू शकत नाही. शरद पवार साहेबांनी महिलांना आरक्षण दिले त्यामूळे महिलांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली. आरक्षणामुळे महिला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुका लढवून चांगल्या रितीने नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत या सर्वांचे नेतृत्व करू शकल्यामहिलांना स्वतःला सिद्ध करायची जी जागा उपलब्ध करून मिळाली ती शरद पवार साहेबांमुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे त्या पक्षाची कार्यकर्ता म्हणून काम करताना मला खूप अभिमान वाटतो. फक्त आरक्षण न देता सक्षमरित्या काम करण्याची संधी सर्व महिलांना आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे मिळत आहे.
शरद पवारसाहेब यांनी राज्यात प्रथमच महिला आयोगाची स्थापना केली त्यांनी महिलांची सामाजिक स्थिती आणि प्रतिष्ठा सुधारण्यासाठी मदत झाली महिलांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तक्रारीचे निवारण करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले. शरद पवार साहेब केंद्रीय संरक्षणमंत्री असताना त्यांनी महिलांना तिन्ही सैन्यदलात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. संरक्षण खात्यात महिलांना ११ टक्के आरक्षण हा त्यांचा क्रांतिकारी निर्णय ठरला.
शरद पवार साहेबांमुळे महिलांना पोलीस दलात भरती होण्याची संधी मिळाली. पवार साहेबांनी महिला, मुलींना आपल्या वडिलांच्या संपत्तीत समान वाटा देण्याचा कायदा केला. हा कायदा पुढे २००५ मध्ये भारत सरकारनेही राबवला. या कायद्यामुळे महिला, मुलींना आधार मिळाला.
ग्रामसभेमध्ये गावातील ७५ टक्के महिलांनी मागणी केल्यास गावातील दारूचे दुकान बंद होईल हा कायदा शरद पवार साहेबांनी केला. महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गट चळवळ उभी करुन राज्यातील महिला बचत गटांना केवळ ४ टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय शरद पवार साहेबांनी घेतला
शरद पवार साहेब यांचे हे निर्णय महिलांसाठी फायद्याचे ठरले आहेत ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवा
राज्यात देशात महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे केंद्र सरकारने अधिवेशन घेऊन महिलांना आरक्षण देण्याचे सांगितले पणं आधी महिलांना सुरक्षितता दया मग आरक्षण दया महाराष्ट्रात पवार साहेबांनी केव्हाचेच महिलांना आरक्षण दिले आहे.
इथे उपस्थित सर्व अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करत आहेत पण आगामी काळात आणखी जोमाने पक्षाचे कार्य करण्याचा शब्द दया कारण महिलांनी ठरवले तर सत्ता आणू पण शकतात सत्ता उलथवू पण शकतात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रणरागिणी ते करतील कारण राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये महिलांना मान , सन्मान, सुरक्षितता दिली जाते शरद पवार साहेब संघटनेसाठी खुप मेहनत घेत आहेत निवडणूक आयोगात शरद पवार साहेब गेले त्यावेळी सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते ते साहेबाना आयोगात जावे लागणे कुणालाही पटले नाही
म्हणुन आगामी काळात संघटना मजबुत करा गाव पातळी पासुन जिल्हा पातळी पर्यंत नेमणुका करून संघटन वाढवा पक्षाची ध्येय धोरणे पोहचवा प्रत्येक बूथ वरती दहा महिलांचे संघटन उभारा कारण महिला घरातील चुलीपर्यंत जाऊन पक्षाचा प्रचार प्रसार करू शकतात घरातील लोकांचे मत परिवर्तन करू शकतात हि महिलांची ताकद आहे
लोक सोबत यायला तयार आहेत आपण लोकांपर्यंत पोहचून त्यांना पक्षाची ध्येय धोरणे शरद पवार साहेबांचे कार्य आणि विचार सांगा असे त्यांनी उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांना आवाहन केले
प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील म्हणाले महाराष्ट्रात वेगवेगळ्या विषयांवरील आंदोलने हातात घेऊन आपण लढायला हवे. एप्रिल २०२२ ला महागाई ७.७९% इतकी होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात महागाई, बेकारीचे प्रमाण वाढत चालले आहे. सरकारी नोकर म्हणून तरुण-तरुणींची काम करण्याची इच्छा आहे. परंतु, सरकार आता नोकर नेमण्याऐवजी कायम स्वरूपीचे कंत्राटी कामगार नेमायची भाषा बोलत आहे, याचा अर्थ महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांवर अन्याय करायचे सरकारने ठरवलेले आहे. यासाठी येणाऱ्या काळात आपण सर्वांनी खंबीरपणे काम कसे केले पाहिजे, यासाठी पक्ष बांधणी महत्त्वाची आहे. महाराष्ट्रात शरद पवार साहेबांचा करिष्मा, साहेबांची ताकद, जनतेच्या मनातले त्यांचे आदराचे स्थान हे तुमचं आणि आमचं भांडवल आहे. जी मते देणारी माणसे आहेत त्यांच्या मनात शरद पवार आहेत, त्यामुळे शरद पवार साहेब जिथे उभे राहतील तेथेच पक्ष असेल.
पक्षाच्या कार्याध्यक्षा खा. सुप्रियाताई सुळे मार्गदर्शन करताना म्हणाल्या,आज दुर्दैवाने इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत देश पुढे असेल पण फक्त इन्फ्रास्ट्रक्चरने माणसाच्या आयुष्यात बदल होत नाही. एक मोठा समृद्धी महामार्ग झाला परंतु प्रॉफिट पेक्षा नुकसानच जास्त झालेले आहे. तेथील गावे आणि छोटे- छोटे दुकानदार यांचे महत्त्व आज कमी झालेले आहे. बऱ्याच जणांचा वेळ वाचत असेल, परंतु त्या समृद्धी महामार्गाने आपल्या मराठी माणसाच्या आयुष्यात बदल झाला याचे उत्तर मात्र माझ्याकडे नाही. पुण्यातल्या अनेक लोकांना मेट्रो पाहिजे, परंतु माझा मेट्रोला विरोध नाही पण मी त्यांच्या जागी असते तर, हजारो करोडो रुपये मेट्रोवर घालवले नसते, पहिले सर्व पीएमपी बसेस, एसटी महामंडळ हे सर्व नीट करून मगच मेट्रोमध्ये पैसा गुंतवला असता. रोटी, सब्जी, दाल चावल आधी की मोदक आधी ? मेट्रोचे पैसे हे एसटीमध्ये टाकले असते, तर महिलांना ५०% सूटचा फायदा प्रत्येक महिलेला झाला असता.
राष्ट्रिय अध्यक्ष शरद पवार साहेब मार्गदर्शन करताना म्हणाले
महिला धोरण, आरक्षण या विषयांवरील चर्चा आज येथे झाली. कर्तुत्वाचा वाटा फक्त पुरुषांकडे असतो हे चुकीचे असून तुम्ही स्त्रियांनी देखील आज दाखवून दिले की, तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही कर्तुत्ववान स्त्री नक्कीच बनू शकता. ‘प्रॉपर्टीत अधिकार’ याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झालेली नाही असे मला वाटते. माझ्याकडे सत्ता असताना आम्ही एक निर्णय घेतला की, शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये सातबाराचा उतारा जो असतो त्यात दोघं पती-पत्नीचे नाव असलं पाहिजे. हा निर्णय काही ठिकाणी राबवला गेला परंतु, १००% राबवले गेले असे दिसत नाही. तर आता हे कार्यक्रम आपल्याला हातामध्ये घेऊन सरकार दरबारी आग्रह धरावा लागेल. माझ्याकडे संरक्षण खाते होते तेव्हा आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या प्रमुखांचा अतिशय विरोध असताना देखील संरक्षण खात्यात मुलींना आरक्षण दिले गेले. आणि आज आपण पाहतो २६ जानेवारीला दिल्लीची परेड ही मुलीच करत असतात.
मणिपूर सारखी स्थिती आज आपण सर्वांनीच पाहिलेली आहे, जेथे महिलांची धिंड काढली जाते, व्यक्तिगत हल्ले केले जातात, जिवंत मारले जाते आणि हे सर्व भारतात होतं याबद्दलची आपली भूमिका अतिशय जागृकतेने आपण प्रत्येकाने मांडायला हवी. असा काही प्रकार घडला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या भागातल्या भगिनी या रस्त्यावर उतरल्याच पाहिजे आणि त्यासाठी आग्रह हा धरलाच पाहिजे. ऱ्हास्त प्रश्नांसाठी रस्त्यावर येणे हा आपला हक्क आहे आणि त्याबाबत भूमिकाही आपण घेतलेच पाहिजे.
समायोजन करण्यासाठी काही वर्ग, शाळा बंद करायचे असे राज्य शासनाकडून सांगण्यात येत आहे. आपण महाराष्ट्रात आहोत. सावित्रीबाई फुले यांनी समाजाचा विरोध असताना देखील पहिली शाळा काढली. आणि आत्ता महाराष्ट्रात शाळा बंद करणे, मुलांना शाळेच्या बाहेर काढणं हे सर्व सुरू असताना महाराष्ट्रातल्या सावित्रीच्या लेकी अशा गप्प बसणे याचा जाब लोक आपल्याला विचारतील आणि म्हणूनच माझा आग्रह आहे की, तुमच्या परिसरात प्राथमिक शिक्षणातून मुलांना बाजूला ठेवण्याचा जो काही डाव चाललेला आहे तो आज थांबवून आपण त्याबद्दलची काळजी घ्यायला हवी.
सरकारचे मत असे आहे की, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरती करू. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीच्या नोकरीत महिलांना संधीच मिळणार नाही आणि त्यामुळे आपण सर्वांनी एकत्रित येऊन यासंदर्भातला विरोध करणारा कार्यक्रम घेवून सरकारला जागे करायला हवे. जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या शाळा या आता खाजगी कंपनींना देण्यात येत आहे आणि त्यांनी सीएसआर फंडातून शाळा चालवून विकास करावा. आता ज्या कंपन्यांनी शाळा दत्तक घेतल्या त्या शाळांना कोणत्याही पद्धतीचे नाव देण्याचा त्यांना अधिकार नाही. शाळेतील शासकीय संपत्ती आणि साहित्याचा वापर हा वैयक्तिक कारणासाठी देखील होऊ शकेल. त्यामुळे शासकीय शाळा खाजगी कंपनींना दत्तक द्यायच्या या निर्णयाला देखील आपण विरोध केला पाहिजे. या सर्व निर्णयांवर आम्ही स्वस्थ न बसता सरकारला या बाबत योग्य तो निर्णय घ्यायला भाग पाडू हे चित्र या राज्यात तयार करायचे आहे. यावेळी राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकारी महिलांची उपस्थिती होती. रोहिणी खडसे यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतल्या नंतर पहील्यांदाच झालेली बैठक यशस्वीरित्या पार पडली
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा