भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

दसऱ्यानंतर आगामी निवडणुकांच्या तयारीला लागणार- नवाब मलिक

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,वृत्तसंस्था। दसऱ्यानंतर आगामी निवडणुकांच्या तयारीला सुरुवात करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्यातील आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या पाठी केंद्रीय यंत्रणांचा ससेमीरा लावण्यात येत आहे. परंतु न डगमगता सामना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सणासुदीच्या दिवस असल्यामुळे दुकाने हॉटेलांच्या वेळेत वाढ करण्याबाबत एकमत झाले असून मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बैठकीत झालेल्या चर्चेविषयी माहिती दिली आहे. नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की, बैठकीत राजकीय परिस्थितीचा आढावा, पोटनिवडणुकीचा आढावा घेण्यात आला. पुर्वीपेक्षा भाजपच्या ३० जागा त्यातील ७ जागा कमी झाल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत. सगळा आढावा घेतल्यानंतर आगामी ३ ते ४ महिन्यांमध्ये या राज्यातील जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत या निवडणुका होणार आहेत. या ३६ जिल्ह्याची जबाबदारी मंत्र्यांना सोपवण्यात आली असल्याची माही नवाब मलिक यांनी दिली आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या माध्यमातून शिबीरे सुरु करण्यात येणार आहेत. मेळावे सुरु करण्यात येणार आहे. यासाठी तयारी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दसरा संपल्यावर कार्यक्रमाची सुरुवात होईल. आणि पूर्ण ताकदीने निवडणुका लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आघाडी आणि युतीच्या बाबत अस्थानिक पातळीवर ज्या जिल्ह्याची राजकीय परिस्थिती असेल त्या प्रमाणे सगळे अधिकार खालच्या पातळीवर देण्यात येणार आहे. पदाधिकारी पालकमंत्री याबाबतचा आढावा घेऊन अहवाल राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सादर करतील आणि त्याच्या नंतर हा निर्णय होणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!