NCB पथकाची मोठी कारवाई : जळगावात १५०० किलो गांजा पकडला
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : राज्यात सध्या ड्रग्ज (Drugs) विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. याच दरम्यान आता मुंबई (Mumbai) एनसीबीच्या (NCB) पथकाने जळगावात (Jalgaon) एक मोठी कारवाई करत तब्बल 1500 किलो गांजा जप्त केला आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती होती मात्र, ती कारवाई नांदेड जिल्ह्यात झाल्याची आता समोर येत आहे. एनसीबीच्या पथकाने यावेळी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरु आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाचे विशाखापट्टणम कनेक्शन समोर आले आहे.
एनसीबीच्या पथकाला खबऱ्याकडून टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी ट्रकमधून वाहतूक करणाऱ्यात येत असलेला गांजा पकडला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल 1500 किलोचा गांजा जप्त करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशच्या विखाशापट्टणम येथून हा गांजा विक्रीसाठी महाराष्ट्रात आणण्यात आला होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच, त्यांनी धाड टाकून गांजाची पोती ताब्यात घेतली आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच श्रीनगरमधून २४ किलो चरस आणून मुंबईला पुरवणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या टोळीकडून पोलिसांनी २४ किलो चरस जप्त केला. ज्याची किंमत सुमारे १४ कोटी ४० हजार आहे. विशेष बाब म्हणजे ड्रग्जची ही खेप एका सेंट्रो कारमधून श्रीनगरहून मुंबईत आणण्यात आली होती. सर्व आरोपी हे पवईचे रहिवासी आहेत.