भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

गणेशोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर : सार्वजनिक मंडळांना ४ फूटांच्या गणेश मूर्तींची मर्यादा !

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

मुंबई, प्रतिनिधी : कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण पडले होते. यंदा गणेशोत्सव जल्लोषात आणि नेहमीच्या थाटात साजरा होईल, अशी आशा होती. मात्र, करोनाच्या दुसऱ्या लाटेने त्यावर पाणी फेरले. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली, तरी धोका ओळखून राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नियमावली निर्धारित केली आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव २०२१च्या मार्गदर्शक सूचना

  • सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांना पालिका किंवा स्थानिक प्रशासनाच्या धोरणारणानुसार पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असणार आहे. महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाने मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.
  • सार्वजनिक गणपतींच्या सजावटीत कोणतीही भपकेबाजी नसावी. सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूटांची आणि घरगुती गणेश मूर्ती २ फूटांची असावी.
  • पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी धातू,संगमरवरी मूर्तींचे पूजन करावे. शक्यतो शाडूच्या मातीच्या मूर्तीचे पूजन करावे. गणेश मूर्तींचे विसर्जन शक्यतो घरी किंवा कृत्रीम विसर्जन स्थळी करावे.
  • सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयक कार्यक्रम, रक्तदान शिबीरे यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन करावे. आरती भजन, किर्तनाच्या कार्यक्रमात गर्दी होणार याची दक्षता घ्यावी.
  • गणेशोत्सवात स्वेच्छेने दिलेल्या वर्गणी, देणगीचा स्वीकार करा. आरोग्य आणि सामाजिक विषयी संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित कराव्यात.
  • सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडपात निर्जंतुकीकरण, थर्मल स्क्रिनींग सारख्या पर्यायाची व्यवस्था करावी. मंडपात दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क,सॅनिटायझर पाळण्याकडे लक्ष देण्यात यावे.
  • सार्वजनिक मंडळांनी श्रींच्या ऑनलाईन दर्शनसाठी, केबल नेटवर्क,वेबसाईट, फेसबुक यारख्या माध्यमांची व्यवस्था करावी.
  • सार्वजनिक गणेशोत्सव आणि घरगुती श्री गणेशांच्या मूर्तींची आगमन किंवा विसर्जन मिरवणूक काढू नयेत. विसर्जनावेळी पारंपरिक पद्धतीने होणारी आरती घरुनच करु येणे. विसर्जन स्थळी नागरिकांना जास्त वेळ थांबता येणार नाही.

माहापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने गणेश मुर्तींच्या विसर्जनसाठी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात यावी असे शासनाकडून सांगण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या काळात शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असणार आहे. सरकारच्या या नवीन मार्गदर्शक सूचनांनंतर प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या काळात आणखी काही सूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!