भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीयराष्ट्रीय

१६ आमदार पात्र की अपात्र? वाद पुन्हा सुप्रीम कोर्टात,आज सुनावणी

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यात एकीकडे युती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाबाबत चर्चा सुरू असताना दुसरीकडे ठाकरे विरुद्ध शिंदे हा वाद सुटता सुटत नाहीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र की अपात्र? हा वाद पुन्हा सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात जाणूनबुजून सुनावणीला उशीर करत असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.

यासंदर्भातील याचिका त्यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. आज या याचिकेवर महत्वपूर्ण सुनावणी होणार असून सुप्रीम कोर्ट नेमकं काय निर्णय देतं? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. सर्वोच्च न्यायालयाने साधारण अडीच महिन्यांपूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याचा अधिकार दिला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह या आमदारांना अपात्र करण्याबाबत योग्य तो निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, या निर्णयासाठीची वेळ ठरवून देण्यात आलेली नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष यासंदर्भात जाणून बुजून उशीर करत असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी यासंदर्भात कोर्टात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करताच विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटातील (शिंदे आणि ठाकरे) आमदारांना नोटीस पाठवली आहे.

या आमदारांना अपात्र का केले जाऊ नये असे विचारत ७ दिवसांच्या आत उत्तर मागविले आहे. लेखी उत्तर आले नाही तर विधानसभा अध्यक्ष आमदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी बोलावणार आहेत. निवडणूक आयोगाकडून विधीमंडळाला शिवसेनेच्या घटनेची प्रत प्राप्त झाली आहे. त्यावर तसेच आमदारांनी दिलेल्या पुराव्यांआधारे नार्वेकर निकाल देणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!