भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यावर आज पासून अवकाळी पावसाचं संकट, कोणत्या भागात पडणार पाऊस

मुंबई,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। राज्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बांगलादेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे दक्षिण भारतासह महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. यामुळे राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबईमध्ये पहाटे थंडीचा कडाका वाढला आहे. तर राज्यातील नाशिक आणि निफाडच्या तामानात कमालीची घट झालेलीआहे, तर विदर्भात आणि मराठवाडातील तापमानातही घट झाली आहे. यामुळे राज्यातील पुढील तीन दिवस काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्याता आहे.

राज्यात २२,२३ आणि २४ जानेवारीला विदर्भातील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भात आज पावसाच्या हलक्या सरी बरसणार आहेत. राज्यात ४८ तासात उत्तर भारतात दाट धुके पडण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवली आहे.

उत्तर भारतात थंडी कायम
उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. पंजाब, त्रिपुराच्या हरियाणा, चंदीगड, राजस्थान आणि पश्चिम बंगालच्या काही भागातील धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. २२ आणि २३ जानेवारी दरम्यान मध्य प्रदेशातील काही भागात थंडी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच देशातील २३ आणि २५ जानेवारी देशभरातील विविध भागात थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाजही आयएमडीने वर्तवली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!