भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

बुलढाणामहाराष्ट्रराजकीय

आणखी ३ खासदार आणि ८ आमदार आमच्या संपर्कात, शिंदेंगटाच्या खासदाराचा मोठा दावा

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना गटात इन्कमिंग सुरूच आहे. गजानन कीर्तिकर यांच्या सारखे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिंदे गटात सामील झाले असून आता ठाकरे गटाचे ३ खासदार आणि ८ आमदार शिंदे गटात येतील असा दावाच बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे.

बुलडाणा जिल्ह्याचे शिंदे गटात गेलेले खासदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा एक गौप्यस्फोट केला आहे. निवडणूक च्या तोंडावर ३ खासदार आणि ८ आमदार शिंदे गटात १०० टक्के येतील असा दावा केला आहे. गजानन कीर्तिकर यांच्यानंतर ३ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहे. आम्ही लोकांमध्ये राहणारे आहोत. आणखी काही लोक आमच्या संपर्कामध्ये आहे. पण काही स्थानिक अडचणी आहे, जिल्ह्यातील काही काम आहे. नेतृत्वावर प्रेम आहे म्हणून ते तिकडे थांबलेले आहे. जशा निवडणुकासमोर येतील शिवसेनेचे घर खाली झालेले असेल, असा दावाही प्रतापराव जाधव यांनी केला आहे.

या अगोदर देखील खासदार जाधव यांनी मुंबईचे एक खासदार शिंदे गटात येतील असा गौप्यस्फोट केला होता. त्या अनुषंगाने खासदार गजानन कीर्तिकर शिंदे गटात सामील झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा खासदार जाधव यांनी ठाकरे गटाचे ३ खासदार आणि ८ आमदार शिंदे गटात सामील होतील असा दावा केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!