भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

५३ पैकी ४० राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांसोबत ; बातमीनं खळबळ

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। विधानसभेचे विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, अजित पवार भाजपत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच याच पार्श्वभूमीवर एका बातमीने मोठी खळबळ उडवली आहे.

राष्ट्रवादीच्या ५३ आमदारांपैकी ४० आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याचं वृत्त द न्यू इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राच्या बातमीनं मोठी खळबळ उडाली आहे. योग्यवेळ आल्यावर ४० आमदारांच्या पाठिंब्याची यादी अजित पवार राज्यपालांना देणार असल्याची बातमी द न्यू इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राने दिली आहे. अजित पवारांनी ४० आमदारांना वैयक्तिकरित्या संपर्क साधला असल्याचंही या बातमीत म्हणण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधी अजित पवारांनी शपथ घेतल्यास सरकर पडण्याची वेळ येणार नाही, असं द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या बातमीत म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!