देशातील ५९४ डॉक्टरांनी प्राण गमावले
देशात सर्वाधिक डॉक्टरांचा मृत्यू दिल्लीत,तर महाराष्ट्रात….!
Monday To Monday NewsNetwork।
मुंबई(वृत्तसंस्था)। आरोग्य यंत्रणेच प्रभावी काम असताना देखील देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला. कोरोना संबंधित अनेक रेकॉर्डस ब्रेक केले आहेत. अशात कोरोना रुग्णांसाठी अहोरात्र आपल्या जीवाची परवा न करता काम करत असलेल्या डॉक्टरांना कोरोनाची लागण अधिक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे अनेक डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. इंडियन मेडिकल एसोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ५९४ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत सर्वाधिक डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात १७ डॉक्टरांनी प्राण गमावले आहेत.
कोणत्या राज्यात किती डॉक्टरांचा मृत्यू?
राज्य डॉक्टरांच्या मृत्यूची संख्या
आंध्र प्रदेश ३२
आसाम ८
बिहार ९६
छतीसगढ ३
दिल्ली १०७
गुजरात ३१
गोवा २
हरयाणा ३
जम्मू आणि काश्मीर ३
झारखंड ३९
कर्नाटक ८
केरळ ५
मध्य प्रदेश १६
महाराष्ट्र १७
मणिपूर ५
ओडिसा २२
पोद्दुचरी १
पंजाब ३
राजस्थान ४३
तामिळनाडू २१
तेलंगणा ३२
त्रिपुरा २
उत्तर प्रदेश ६७
उत्तराखंड २
पश्चिम बंगाल २५
इतर १
कोविड-१९ इंडियाच्या ट्रॅकरनुसार, देशात आतापर्यंत २ कोटी ८३ लाख ६ हजार ८८३ कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत ३ लाख ३५ हजार १४४ जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी ८१ लाख ७० हजार ९९२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १७ लाख ८९ हजार ४७० रुग्णांवर अजूनही उपचार सुरू आहेत.