भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोठा झटका, आर्थिक मागास विभागातून अर्ज भरण्याची मुभा रद्द

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सरकारी नोकर भरतीची वाट पाहणाऱ्या मराठा उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारी नोकर भरतीत यापूर्वी मराठा उमेदवारांना मराठा आरक्षण कायद्याअंतर्गत जागा राखीव करुन संधी दिली जात होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्या कायद्याला स्थगिती देत तो कायदा रद्दा केला म्हणून त्या उमेदवारांना भरती प्रक्रियेच्या मध्यात आर्थिकदृष्ट्यी दुर्बल घटकांच्या आरक्षणाची संधी पूर्वलक्ष्यी प्रभावाने खुली करण्याचा राज्य सरकारचा निर्णय बेकायदा आहे, असा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्राप प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) गुरुवारी दिला आहे. तसेच भविष्यातील सरकारी नोकर भरतीमध्ये मराठा समाजातील पात्र उमेदवारांना राज्यघटनेच्या अनुच्छेद 14, 16(4), आणि 16(6) अन्वयेमधील तरतुदींप्रमाणे EWS आरक्षण खुले असायला हवे, असंही मॅटच्या अध्यक्ष न्या. मृदुला भाटकर आणि सदस्य मेधा गाडगीळ यांच्या खंडपीठाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. खंडपीठाने 60 पानांचा निर्णय हे स्पष्ट केलं आहे.

लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) सन 2019 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातील 111 पदे, वन विभागात 10 पदं आणि राज्य कर विभागात 13 पदं अशी एकूण 134 पदांसाठी जाहीरात देत निवड प्रक्रिया सुरु केली होती. त्यात मराठा उमेदवारांनी देखील मराठा आरक्षाअंतर्गत अर्ज दाखल केला होता. तसेच ईडब्ल्यूएस आरक्षणासाठी पात्र उमेदवारांनी त्याअंतर्गत अर्ज केले होते. या भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा आणि मुलाखत अशी निवड प्रक्रिया देखील पूर्ण झाली. असे असताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला 9 सप्टेंबर 2020 रोजी स्थगिती दिल्यामुळे राज्य सरकारने मराठा उमेदवारांना 23 डिसेंबर 2020 च्या जीआरद्वारे पूर्वलक्ष्यी प्रभावाने ईडब्ल्यूएस आरक्षणांतर्गत संधी खुली केली.

यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा 5 मे 2021 रोजी रद्दबाबत ठरवले असतानाही राज्य सरकारने 31 मे 2021 च्या जीआरद्वारे मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएसचा पर्याय घेण्याची मुभा दिली. यानंतर उमेदवारांनी हे दोन्ही निर्णय बेकायदा आणि मनमानी असल्याचा दावा करत EWS गटातील अनेक उमेदवारांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते, सबिहा अन्सारी, सय्यद तौसिफ यासीन यांच्यामार्फत आक्षेप घेतला होता.

यापूर्वी महावितरणाच्या भरती प्रक्रियेत मुंबई उच्च न्यायालयाने याच मुद्द्यांवरील याचिकांवर निर्णय देतान राज्य सरकारचा निर्णय मनमानी आणि बेकायदा असल्याचे म्हणत ईडब्ल्यूएस आरक्षणातून हक्क मिळालेल्या उमेदवारांचे नुकसान करणारा असल्याचा निर्णय दिला आहे, त्याविरोधातही अपीलह सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. असंही मॅटच्या खंडपीठाने आपल्या निर्णयात स्पष्ट केलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!