भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड, नेमका कुणाचा आला फोन की अजित पवारांचे सर्व कार्यक्रम तडकाफडकी रद्द

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याला कारण ठरलं आहे अजित पवारांचा एक निर्णय. विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवार यांनी त्यांचे उद्याचे सगळे कार्यक्रम रद्द केलं आहे. अजित पवारांनी अचानक हा निर्णय का घेतला? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवारांना शरद पवारांचा फोन आला, त्यानंतर अजित पवार सगळे कार्यक्रम रद्द करून बारामतीमध्ये आले आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. आज दुपारीच अजित पवारांनी त्यांचा कॉनवॉय आणि स्टाफ सोडला आणि ते खासगी गाडीने रवाना झाले आहेत.

अजित पवार मांजरीमधील कार्यक्रमाला जात होते, पण तिकडे जात असतानाच त्यांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले. येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यातच आता अजित पवारांनी अचानक त्यांचे उद्याचे सगळे कार्यक्रम रद्द केले आहेत.

महाराष्ट्रात 2019 च्या सत्तासंघर्षामध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला धक्का देत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तेव्हापासून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मैत्रीची चर्चा होते. महाविकासआघाडीकडून मागच्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत, पण अजित पवारांनी याबाबत वेगळी भूमिका घेतली. 2014 साली देशाच्या जनतेने पंतप्रधान मोदींना डिग्री पाहून निवडून दिलं नाही, असं विधान केलं.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!