महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल च्या दरात मोठी घसरण, सामान्यांना मोठा दिलासा
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल झाल्याचे आजशनिवारी सकाळी दिसून आले आहे. आनंदाची बाब म्हणजे महाराष्ट्रात पेट्रोलचा दर 1.02 रुपयांनी कमी झाला असून 106.15 रुपये प्रतिलिटर भावाने पेट्रोल मिळणार आहे. तर डिझेल 99 पैशांनी घसरून 92.67 रुपये प्रतिलिटर दराने सध्या विकले जात आहे. परंतु अनेक राज्यांमध्ये इंधन महाग झाले आहे. पंजाबमध्ये पेट्रोल 22 पैशांनी तर डिझेल 23 पैशांनी महागलेआहे. उत्तर प्रदेशातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 22 पैशांची वाढ झाली आहे. तामिळनाडू, राजस्थान, हरियाणा आणि कर्नाटकातही इंधनाचे दर वाढले आहेत.
शनिवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली. आज WTI क्रूड $ 2.15 किंवा 2.74 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल $ 76.34 वर सध्या व्यापार करत आहे. दुसरीकडे, ब्रेंट क्रूड देखील $ 2.14 (2.51%) ने घसरून $ 83 वर आले आहे. देशातील तेल कंपन्यांकडून दररोज सकाळप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केल्याचे पाहाला मिळत आहे. दरम्यान, अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल झाल्याचे शनिवारी सकाळी दिसून आले आहे.