भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

राज्य सरकारचा मोठा निर्णय ; राज्यातील रुग्णालयांमध्ये सर्वांना मोफत आरोग्य सेवा, काय आहे योजना?

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्रातील जनतेसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोणत्याही आजारासाठी तुम्ही रुग्णालयात गेलात छोट्या छोट्या गोष्टींसाठी पैसे भरावे लागायचे. पण आता सरकारी रुग्णालयांमध्ये पूर्णपणे मोफत उपचार केले जाणार आहेत.

आरोग्यमंत्र्यांनी केली होती घोषणा
१५ ऑगस्टपासून या योजनेचा सर्व खर्च महाराष्ट्र सरकार उचलणार आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ३ ऑगस्ट रोजीच ही योजना जाहीर केली होती आणि आता ती लागू होणार आहे. यासोबतच उपचारासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

डिस्चार्ज देताना शुल्क नाही,चाचण्यांचे शुल्क नाही
बाहेरील औषधी रुग्णांस देणे आवश्यक असल्यास आरकेएस अनुदानातून स्थानिकरित्या औषध खरेदी करून मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच इसीजी, एक्सरे, सिटी स्कॅन, प्रयोगशाळा चाचण्यांचे शुल्क आकारण्यात येणार नाही.
आंतररुग्ण विभागामध्ये दाखल असलेल्या रुग्णास डिस्चार्ज करताना कोणत्याही प्रकारचे शुल्क घेण्यात येणार नाही.

आधी घेतलेले शुल्क जमा
यापूर्वी रुग्णांकडून जमा करण्यात आलेले शुल्क शासन खाती अथवा रुग्ण कल्याण निधीमध्ये जमा करावे आणि त्याबाबतचा लेखाजोखा अपडेट करावा असे निर्देश देण्यात आले आहेत.


कर्मचाऱ्यांवर कारवाई
आरोग्य संस्थेमध्ये शुल्क आकारण्यात आल्याचे आढळल्यास संबधित कर्मचाऱ्यांवर कारवाईचे निर्देशही देण्यात आले आहेत.

अडीच कोटींहून अधिक लोकांना लाभ
राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालय, महिला रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि कर्करोग रुग्णालयात हे उपचार पूर्णपणे मोफत असतील. ही सुविधा राज्यातील एकूण २४१८ रुग्णालये आणि वैद्यकीय केंद्रांना लागू आहे. राज्यातील अडीच कोटींहून अधिक लोकांना याचा थेट लाभ मिळणार असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे.

मेडिकल कॉलेजमध्ये पैसे भरावे लागतील
मात्र, ही योजना राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांना लागू होणार नाही. याचा अर्थ वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेण्यासाठी लोकांना पैसे मोजावे लागतील, तर इतर सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार पूर्णपणे मोफत असतील. २०१९ मध्ये कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व जनतेसाठी मोफत आरोग्य विमा योजना जाहीर केली होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!