भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

राज्यात मोठा राजकीय भूकंप, अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांनी घेतली शपथ

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गेल्या वर्षभरापूर्वी राज्याच्या राजकीय इतिहासात आत्तापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय भुकंप झाला होता. 30 जून 2022 या दिवशी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या सरकारने दोन दिवसांपूर्वी वर्षपूर्तीचा सोहळा साजरा केला. त्यानंतर आता आज (ता. 02 जुलै) पुन्हा एकदा राजकारणात भुकंप झाला असून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या समर्थनातील 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झाला आहे.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून त्यांच्यासोबत छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मारावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राजकारणाच्या राजकारणातील ही आजच्या घडीतील सर्वात मोठी घटना मानली जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या आदिती तटकरे या पहिल्या मंत्री ठरल्या आहेत.

अजित पवार हे आज सकाळपासूनच त्यांच्या बंगल्यावर होते. देवगिरी या बंगल्यावर राष्ट्रवादीचे काही आमदारही आले होते. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळेही आल्या होत्या. यावेळी या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर अजित पवार बंगल्यातून निघाले. ते थेट राजभवनात पोहोचले. त्यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राजभवनात आले. अजित पवार यांनी राज्यपालांना 30 आमदारांच्या सह्यांचं पत्र दिलं. त्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांनी अजित पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत इतर नऊ आमदारांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!