ठाकरे गट आणि शिंदे गटात आता नवा वाद पेटणार “या” नव्या नावावरून वादाचा नवा अध्याय सुरू
मुंबई,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। शनिवारी रात्री निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय दिला. निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवले. यामुळे आता उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला शिवसेना हे नाव वापरता येणार नाही तसेच. या दोन्ही गटांना धनुष्यबाण चिन्हाचा देखील वापर करता येणार नाही असे आदेश देखील निवडणूक आयोगाने दिले आहेत. यामुळे आता शिवसेना पक्षाच्या नावावरुन दोन्ही गटांमध्ये वाद पेटणार आहे. कारण, शिवसेना पक्षासाठी ज्या नावावर ठाकरे गट विचार करतोय तेच नाव शिंदे गटाला पाहिजे असल्याची सुत्रांची माहिती आहे.
शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट पडले आहेत. खरी शिवसेना आमचीच असून धनुष्यबाण चिन्ह देखईल आमचेच असल्याचा दावा दोन्ही गटांकडून करण्यात येत होता. अखेरीस निवडणुक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. तसेच शिवसेना हे नाव वापरता येणार नाही असे आदेशही दिले आहेत. यामुळे दोन्ही गटांकडून शिवसेनेला पर्यायी नावाचा विचार सुरु आहे. ‘
शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ या नव्या नावावरून शिंदे आणि ठाकरे गटात वादाचा नवा अध्याय सुरू झाला आहे . आता हा नवा वाद सोडवण्याचा पेचही केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आहे.
‘शिवसेना ठाकरे’ आणि ‘शिवसेना शिंदे’ किंवा ‘शिवसेना राष्ट्रीय’ आणि ‘शिवसेना महाराष्ट्र’ ही नावे स्वतंत्रपणे स्वीकारण्यास निवडणूत आयोगाने दोन्ही गटांना संमती दिली असती तर वाद निर्माण झाला नसता. मात्र, दोन्ही गटांनी ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ हे नाव निवडले आहे. हे नाव मिळवण्यासाठी दोन्ही गट आक्रमक आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगासमोर पेच निर्माण झाला आहे. ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळवण्यावर दोन्ही गट ठाम राहिल्यास निवडणूक आयोग हे नाव गोठवू शकते अशी एक शक्यता वर्तवली जात आहे.