भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

राज्यात ११ मे नंतर नवे सरकार ? अजित पवार होणार मुख्यमंत्री, दाव्याने खळबळ

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सध्या एकाचवेळी राज्याच्या राजकारणात सध्या अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात अनेक मोठे बदल होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे. आता राज्याच्या राजकारणात नेमके काय घडणार? अनेक तज्ञ अंदाज वर्तवत आहेत.

कायदेतज्ञ असीम सरोदे यांच्या यांनी एक मोठा दावा केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी ११ मे नंतर मोठ्या घडामोडी घडून अजित पवार येत्या काळात भाजप सोबत जातील आणि मुख्यमंत्री बनतील असा मोठा दावा केला आहे.

असिम सरोदे यांनी केलेल्या ट्वीटची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष,अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी १० मे च्या आधी नक्की होतील.
११ मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार हे सुद्धा नक्की. — Asim Sarode (@AsimSarode) May 3, 2023

दरम्यान राज्यात नवीन राजकीय जुळवा जुळव सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय जबाबदारी सुप्रिया सुळे तर राज्यातली जबाबदारी अजित पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे, असं मत असिम सरोदे यांनी मांडलं आहे. राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टात सुरु आहे. या निकालाच्या आधारे राज्यातील राजकारण बदलेल. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिवसेनेचे काही आमदार अपात्र होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सरकार पडू शकतं. अशावेळी अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याच संधी आहे.

अजित पवारांनी अनेकदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शरद पवार यांची अडचण होणार म्हणून ते बाजूला गेले आहेत. शिवसेनेचे आमदार अपात्र झाले तर अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळेल. ते महाविकास आघाडीसोबत किंवा भाजप सोबत जाऊन सुद्धा सरकार स्थापन करू शकतात, असा दावा असिम सरोदे यांनी केला आहे. त्यामुळे असीम सरोदे यांच्या या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात नेमके काय घडणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!