रोगप्रतिकारक शक्तीला चकवा देणारा नवा व्हेरिएंट महाराष्ट्रात, नखांमध्ये संक्रमण
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। देशात कोरोना संपला की काय,असे वाटत असताना कोरोनाचा कहर पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. गेल्या १० ते १५ दिवसांपासून भारतात कोरोना संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत. गेल्या पाच दिवसांपासून दररोज आठ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण होत आहे. सोमवारी देशात ८०८४ नव्या रुग्णांची नोंद झालीये. मंगळवारी प्रकरणांमध्ये थोडीशी घट झाली होती. गेल्या २४ तासांत ६५९४ रुग्णांची वाढ झाल्याने चिंता वाढली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या वतीने, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश देण्यात आले आहेत की त्यांनी प्रकरणांचे परीक्षण करणे सुरू ठेवावे आणि देशातील कोरोनाचे नवीन प्रकार ओळखण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंगवर लक्ष केंद्रित करावे. अहवालात दावा केला जात आहे की Omicron चे सब-व्हेरियंट BA.4 आणि BA.5 ची मुंबईत प्रथमच पुष्टी झाली आहे. वैद्यकीय अहवालात असे दिसून आले आहे की मुंबईस्थित कस्तुरबा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेने राज्यात प्रथमच BA.4 प्रकार असलेल्या तीन रुग्णांची आणि BA.5 प्रकारातील एका रुग्णाची पुष्टी केली आहे. यापैकी दोन ११ वर्षांच्या मुली आणि दोन ४०-६० वर्षांच्या पुरुषांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण होम आयसोलेशनमध्ये बरे झाले आहेत. सोमवारी महाराष्ट्रात कोविड-19 चे एकूण १८८५ नवीन रुग्ण आढळले आहेत. मे महिन्याच्या तुलनेत राज्यात महिनाभरात वाढ झाल्याचे समोर आले आहे.
आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत, अशा परिस्थितीत सर्व लोकांनी त्याच्या लक्षणांबाबत विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. एका अभ्यासात शास्त्रज्ञांनी सांगितले की, नखांमध्ये होणारे काही बदल लक्षात घेऊन कोरोना संसर्ग ओळखला जाऊ शकतो. अभ्यासात असे म्हटले आहे की कोविड -19 च्या २०% रुग्णांना त्वचेशी संबंधित समस्या दिसत आहेत. अभ्यासानुसार कोविड-19 संसर्ग झाल्यास नखांवर चिलब्लेन सारखी चिन्हे दिसू शकतात. यामध्ये नखांवर पांढऱ्या रेषा, बोटांच्या नखांमध्ये मुंग्या येणे, नखांचा रंग बदलणे अशा समस्या दिसू शकतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्हाला कोरोनाच्या सामान्य लक्षणांसह नखांमध्ये काही अनपेक्षित बदल दिसले तर त्याबाबत तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, संसर्गामुळे नखांचा रंग आणि पोत कसा बदलतो हे अद्याप अभ्यासात स्पष्ट झालेले नाही, परंतु संसर्गादरम्यान रक्तवाहिन्यांना होणारे नुकसान हे त्यामागचे कारण म्हणून पाहिले जाऊ शकते. देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत असताना, संसर्गाची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सर्वांनी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे.