भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

गुढीपाडव्याच्या तोंडावर रेकॉर्ड ब्रेक, सोन्यानं भाव गाठला तब्बल 60 हजारांच्या पार

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। कधी सोनं स्वस्त होणार अशी वाट पाहणाऱ्यांसाठी आता सोन्याने चांगलाच झटका दिला आहे. सोन्याने आता तब्बल 60 हजारांचा भाव गाठला आहे. RTGS GST चा दर हा तब्बल 60283 इतका झाला आहे. त्यामुळे सोनं विकणाऱ्यांसाठी सोन्याचे दिवस आले आहे, तर गुंतवणूक करणाऱ्यांचा खिसा आता चांगलाच खाली होणार आहे.

महागाईने एकीकडे सर्वसामान्याचं कंबरडं मोडलं आहे. तर दुसरीकडे सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आता लग्नसराईचे दिवस येऊन ठेपले असताना सोन्याला चांगलीच झळाळी चढली आहे. सोन्याचे दराने आता 60 हजारांचा दर गाठला आहे. RTGS GST दरानुसार सोन्याचा भाव हा आता 60 हजार 283 इतका झाला आहे.

विशेषत: सण, उत्सव, घरगुती समारंभ यानिमित्त महिला वर्ग आवर्जून दागिन्यांची खरेदी करतो. तर गुंतवणुकीचा उत्तम मार्ग म्हणूनही सोने चांदीचा विचार केला जातो. मराठी नववर्षारंभ मानला जाणारा गुढी पाडवा हा सण काही दिवसांवर आला आहे. या दिवशी महाराष्ट्रात सोन्या-चांदीची खरेदी केली जाते. त्यामुळे बदलणाऱ्या दरांवर सर्वांचेच लक्ष आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!