खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी घसरण,महगाईने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। खाद्यतेल विकणारी धारा ब्रँड च्या नावाने तेल विकणारी सहकारी कंपनी मदर डेअरीने सोयाबीन,मोहरी आणि सुर्यफूलाच्या तेलाच्या दरात कपात आहे. यासोबतच इतर ब्रँडेड तेल कंपन्याही आपापल्या ब्रँडच्या किंमती कमी करणार आहेत. त्यामुळे महगाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच धारा ब्रँड अंतर्गत विक्री केल्या जाणाऱ्या सर्व खाद्यतेलाच्या दरात १५ रुपयांपर्यंत कमी केल्या जात आहेत. ही कपात थेट विक्री किमतीवर असणार आहे. सरकारचे प्रयत्न, आंतरराष्ट्रीय बाजारातील दरात घट आणि स्थानिक पातळीवर खाद्य तेलाची मुबलक उपलब्धता या कारणामुळे कंपनीने सोयाबीन,मोहरी आणि सुर्यफूलाच्या तेलाच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुधाकार देसाई इंडियन व्हेजिटेबल ऑइल प्रोड्युसर्स असोसिएशनचे अध्यक्ष यांनी दिलेल्या माहितीनुसार खाद्य तेलाच्या दरातील घसरणीचा फायदा आता ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. सध्या पामतेलाच्या दरात प्रतिलिटर ७ ते ८ रुपयांनी घसरण झाली आहे. तर सूर्यफूल आणि मोहरीच्या तेलाच्या दरात प्रतिलिटर १० ते १५ रुपयांनी घट झाली आहे. त्याचवेळी, सोयाबीन तेल ५ रुपयांनी स्वस्त झाले आहे.
तसेच खाद्य तेलाची सर्वात मोठी कंपनी असलेल्या अदानी विल्मरचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या माहितीनुसार कंपनी लवकरच फॉर्च्यून ब्रँड अंतर्गत विक्री केल्या जाणाऱ्या सर्व खाद्य तेलाच्या दराच्या किंमतीत घट करणार आहे. बाजाराचा कल लक्षात घेऊन एमआरपीमध्ये कपात केलेले पॅकिंग पुढील आठवड्यापर्यंत बाजारात पोहोचेल अशी देखील माहिती यावेळी देण्यात आली आहे.
दुसरीकडे हैदराबादची कंपनी जेमिनी एडिबल्स अँड फॅट्सने गेल्या आठवड्यात फ्रीडम सनफ्लॉवर ऑइलच्या एक लीटर पाऊचच्या किंमतीत १५ रुपयांची घट करुन २२० रुपये प्रतिलीटर पाऊच उपलब्ध करुन दिले आहे. या आठवड्यात कंपनी यात आणखी २० रुपये प्रतिलीटर दर कमी करण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सुर्यफूलाच्या तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रशिया आणि अर्जेंटिनासारख्या देशांमधून तेलाचा पुरवठा वाढला आहे. याचा थेट परिणाम किंमतीवर झाला आहे. तेलाच्या मूबलक उपलब्धतेमुळे किंमती आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने कच्च्या सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कही कमी केले आहे. त्यामुळेही तेलाच्या दरात घट झाली आहे.