भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

प्रशासनमहाराष्ट्र

आघाडी सरकारच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची उचलबांगडी ?

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। फडणवीस सरकारशी अत्यंत निकटता ठेवणारे आणि सरकार बदलताच रात्रीतून निष्ठा बदलणाऱ्या अधिकाऱ्यांनाही फटका बसू शकतो, अशी महत्वाची माहिती मिळत आहे.

राज्यात आयएएस, आयपीएसच्या मोठ्या प्रमाणात बदल्या होणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या गोटातील अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदांवरून दूर केले जाणार असल्याची माहिती समोर येतेय. फडणवीस सरकारशी अत्यंत निकटता ठेवणारे आणि सरकार बदलताच रात्रीतून निष्ठा बदलणाऱ्या अधिकाऱ्यांनाही फटका बसू शकतो, आयएएस आणि आयपीएस अधिकारी हे आवडीच्या पोस्टिंगसाठी जोरदार लॉबिग करत आसल्याची माहिती मिळतेय. नेमका आता हा बदलीचा आदेश केव्हा येतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र अधिकारी वर्गात बदलीच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता कुणाची कुठे बदली होते? कोणत्या अधिकाऱ्यांना जवळ केलं जातं आणि कोणते अधिकारी दूर ठेवले जातात, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!