दहा लाखाची मागणी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह खाजगी व्यक्ती एसीबी च्या जाळ्यात
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l तुमच्या विरुद्ध तक्रार असून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. गुन्हा दाखल न करण्यासाठी दहा लाखांची मागणी करणाऱ्या मुंबई मधील दहिसर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक राजेश प्रकाश गुहाडे यांचेसह लाचेच्या रकमेपैकी एक लाख रुपये स्वीकारताना खासगी व्यक्ती गौरव शिरोमणी मिश्रा विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या कंपनीच्या नावे असलेले बँक खाते गोठविले असल्याने तक्रारदार यांनी बँकेत जावून चौकशी केली असता बँकेतील कर्मचाऱ्यांनी तक्रारदार यांना दहीसर पोलीस ठाण्यात तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजेश प्रकाश गुहाडे यांचा मोबाईल क्रमांक देवून अधिक चौकशी करण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी पोलिस उपनिरीक्षक गुहाडे यांना संपर्क साधला असता त्यांनी तक्रारदार यांना तुमच्या विरुद्ध तक्रार प्रप्त झाली असून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. पण तुम्हाला गुन्हा दाखल होऊ द्यायचा नसल्यास गुन्हा दाखल न करण्यासाठी दहा लाख रुपये द्यावे लागतील. अशी दहा लाखाची मागणी केली शेवटी पाच लाख रुपयाची मागणी केली.
या संदर्भात तक्रारदार यांनी १८ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात संपर्क साधत तक्रार दाखल केल्यानंतर एसीबीच्या पथकाने केलेल्या पडताळणीत पोलिस उपनरीक्षक राजेश प्रकाश गुहाडे यांनी शेवटी तडजोडी अंती तीन लाखाची मागणी करुन खासगी व्यक्ती गौरव गम शिरोमणी मिश्रा याच्या मार्फत लाच स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार करण्यात आलेल्या सापळा कारवाईत मिश्रा हा मागणी केलेल्या रक्कमेपैकी एक लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडला गेला. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक राजेश प्रकाश गुहाडे आणि खाजगी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .