भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

राज्यात राजकीय घडामोडींना वेग, सत्तास्थापनेची तयारी?भाजप आमदारांना मुंबई येण्याचे आदेश

मुंबई,मंडे टु मंडे न्यूज वृत्तसेवा। शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजप आमदारांना मुंबई येण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.तर यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय. ही सत्तास्थापनेची भाजपकडून तयारी तर सुरू नाहीय ना, असाही प्रश्न सध्या चर्चेत आहे.

प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना तातडीने मुंबईत येण्याच्या सूचना भाजपने दिल्या आहेत. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंड पुकारले आहे. राज्यात घडामोडी यानंतर भाजपा आमदार मुंबईत राहणे गरजेचे यासाठी बोलवण्यात आले आहे. 

राज्यपाल यांनी अधिवेशन बोलवणे सारख्या काही निर्णय घेतले तर खबरदारी म्हणून भाजपा आमदार बोलवण्यात आले आहे. तिकडे गुवाहाटी येथे असलेले शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदार महाविकास आघाडीमधून बाहेर पडत असल्याचे पत्र राज्यपालांना देऊ शकतात. याचाच अर्थ शिंदे आजच महाविकास आघाडीवर प्रहार करून सरकारमधून बाहेर पडू शकतात.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये समन्वयाची जबाबदारी भाजपचे संजय कुटे, मोहित कंभोज, रविद्र चव्हाण यांच्याकडे देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे हे स्वतःचा वेगळा गट स्थापन करण्याची माहिती राज्यपालांना देणार असल्याचे सूत्रांनी म्हटलंय. हा गटच शिवसेनेचा असल्याचं सांगून राज्यात मोठा राजकीय भूंकप घडण्याची तयारी आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!