भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

अत्याचारातून गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मुलीचा आरोपी सोबतच लावला विवाह

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। नागपूर मधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. १२ वर्षीय अल्पवयीनवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला. मात्र पीडिता गर्भवती राहिल्यानंतर ही बाब दोन्ही कुटुंबीयांच्या लक्षात आली. त्यानंतर पोलिसांत तक्रार न करण्याचे ठरवत पीडिता आणि आरोपीच्या कुटुंबियांनी पीडितेचे आरोपीसोबतच लग्न लावून दिले.

नागपूर मध्ये शेजारी राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणाने त्याचाच फायदा घेत पीडित बालिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिचे शारीरिक शोषण केले. ती गर्भवती झाल्यानंतर दोन्ही कुटुंबाना ही बाब लक्षात आली. यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी परस्पर समझोता करत पोलिसांकडे तक्रार न करण्याचे ठरविले आणि वयाने १० वर्ष मोठ्या आरोपी तरुणाचे लग्न १२ वर्षीय मुलीसोबत लावून देण्यात आले. पीडिता चार महिन्याची गर्भवती असल्याने नुकतच तिच्यावर झालेल्या अत्याचाराची आणि त्यानंतर लावण्यात आलेल्या लग्नाची बाब उघडकीस आली.

या प्रकरणी पोलिसांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात २२ वर्षीय आरोपी विरोधात बलात्कार आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली आहे. पोलिसांना यासंबधीत माहिती मिळाल्यानंतर चौकशी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्यांमार्फत पीडितेची विचारपूस करण्यात आली. तिच्यावर अत्याचार झाल्याची बाब दोन्ही कुटुंबीयांनी लपविली. तसेच कायद्याच्या विरोधात जाऊन तिचे बाराव्या वर्षी लग्न लावले या आरोपाखाली पोलिसांनी आरोपीच्या पालकांविरोधातही बाल विवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, पीडिता चार महिन्याची गर्भवती असल्याने सध्या तिची शारीरिक अवस्था ठीक नसल्याने तिला डॉक्टरांच्या निगराणीत ठेवण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!