न्यायाधीशांनाच चप्पल फेकून मारण्याचा आरोपीचा प्रयत्न
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। न्यायालयातच आरोपीने न्यायाधिशांनाच चप्पल मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कुर्ल्याच्या न्यायालयात घडली, शनिवार १, एप्रिल ला न्यायालयीन कामकाज सुरू असताना आरोपी जावेद सुभाष शेख उर्फ प्रदीप तायडे या ३९ वर्षीय व्यक्तीने असा प्रयत्न केला या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुभाष शेख उर्फ प्रदीप तायडे तायडेवर २०१६ व २०११ मध्ये ना म जोशी मार्ग, ट्राॅम्बे पोलिस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न व मारहाणी सारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. याच गुन्ह्यात तारखेसाठी तायडेला न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयात त्याने आपल्यावरील प्रलंबित असलेल्या खटल्याचा लवकरात लवकर निकाल लावून कोर्टाच्या फेर्यातून मुक्त करावे ही मागणी करत आरडाओरड करत असताना प्रदिप तायडेने अचानक न्यायाधिशांच्या दिशेने पायातली चप्पल मारण्याचा प्रयत्न केला.या धक्कादायक घटनेनंतर आरोपी प्रदिप तायडेवर कुर्ला पोलिस ठाण्यात ३५३,३२८, १८९, ५०६, ५०४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.