भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

२७ एप्रिलला १२ वर्षांनंतर गुरु पुष्य योगाच्या दिवशी विशेष अद्भुत योगायोग ‘या’ राशींना बनवणार कोट्याधीश?

मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गुरु पुष्य योग २०२३: ज्योतिष शास्त्रानुसार, पुष्य योग दर महिन्याला येतो, परंतु जेव्हा तो गुरुवारी येतो तेव्हा तो गुरु पुष्य योग म्हणून मानला जातो आणि जेव्हा तो रविवारी येतो तेव्हा तो रवि पुष्य योग मानला जातो.

ज्योतिषशास्त्राच्या मुहूर्त शास्त्रामध्ये २७ नक्षत्रांपैकी पुष्य नक्षत्र सर्वश्रेष्ठ मानले जाते. या दिवशी शुभ कार्य केल्याने अनेक पटींनी अधिक शुभ फळ प्राप्त होते. असे मानले जाते की या दिवशी लग्ना शिवाय कोणतेही काम सुरू केल्यास नक्कीच यश मिळते. एप्रिल महिन्यात येणारा गुरु पुष्य योग अतिशय विशेष आहे.

एप्रिलचा गुरु पुष्य योग विशेष का आहे?
२७ एप्रिलला येणारा गुरु पुष्य योग खूप खास आहे, कारण या दिवशी फक्त गुरु ग्रहाचा उदय होणार आहे. ज्याने शुभ कार्यास सुरुवात होईल. एवढेच नाही तर या दिवशी अमृत सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योगही तयार होत आहे. असा शुभ योग बनल्याने माणसाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.

गुरु पुष्य योग कधी होतो?
हिंदू कॅलेंडरनुसार, गुरु पुष्य योग गुरुवार, २७ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून सुरू होईल आणि २८ एप्रिल रोजी सकाळी ६:०७ पर्यंत चालू राहील. यासोबतच सर्वार्थ सिद्धी योग सकाळी ६:५९ ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच २८ एप्रिल रोजी पहाटे ५:५९ पर्यंत सुरू राहील. यासोबतच सर्वार्थ सिद्धी योगासह अमृतसिद्धी योगही राहणार आहे.

गुरु पुष्यात जन्मलेल्या लोकांचे भविष्य
नारद पुराणानुसार गुरु पुष्य नक्षत्रात जन्मलेले लोक खूप यशस्वी मानले जातात. या नक्षत्रात जन्मलेले लोक बलवान, दयाळू, धार्मिक प्रवृत्ती असलेले सत्यवादी असतात आणि ते खूप श्रीमंत देखील असतात.

हे काम गुरु पुष्य योगावर करा
गुरु पुष्य योगामध्ये धर्म-कर्म, कर्मकांड, मंत्र दीक्षा करार, व्यवसाय सुरू करणे यासाठी अत्यंत शुभ मानले जाते.
गुरु पुष्य योगामध्ये भगवान विष्णूची विधिवत पूजा करा. यासोबतच विष्णु सहस्त्रनाम पाठ करणे फायदेशीर ठरू शकते. यासोबतच कुंडलीत गुरूची स्थिती मजबूत होते.
गुरु पुष्य योगात गरजू व्यक्तीला धान्य, पाणी, कपडे, पैसा इत्यादी दान अवश्य करा. असे केल्याने कुंडलीत गुरूची स्थितीही मजबूत होऊ शकते.
गुरु पुष्य योग आणि गुरु उदयाच्या वेळी सत्तू, गूळ, पाणी, तूप, मातीचे भांडे देणे फायदेशीर मानले जाते

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालीचा आपल्या आयुष्यावर शुभ किंवा वाईट परिणाम दिसून येतो. २७ नक्षत्रापैकी एक पुष्य नक्षत्र योग गुरुवारी आल्यामुळे गुरु पुष्य योग जुळून आला आहे. त्याशिवाय यासोबत तब्बल १२ वर्षांनी अत्यंत दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. गुरु गोचरसह गुरुगुष्यामृत योगामुळे काही राशींचं नशिबात आर्थिक लाभ आहे. यामध्ये तुमच्या राशीचा समावेश आहे का जाणून घ्या.

मेष (Aries)
गुरुपुष्यामृत योग आणि गुरु उदयामुळे या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. ऑफिसमध्ये आतापर्यंत केले कामाचं फळ मिळणार आहे. तुमच्या प्रत्येक कामात यश मिळणार आहे. पगारवाढ आणि पदोन्नतीची शक्यता आहे. नवीन नोकरीची संधी आहे. कुटुंबात शुभ कार्य ठरण्याची शक्यता आहे.

तूळ (Libra)
गुरुपुष्यामृत योग आणि गुरु उदयामुळे या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या लोकांना आर्थिक लाभासह त्यांना प्रत्येक कामात यश मिळणार आहे. नातेसंबंध मजबूत करणारा काळ ठरणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरणार आहे.

धनु (Sagittarius)
या राशीच्या लोकांना हा काळ शुभ ठरणार आहे. करिअरसाठी हा काळ सर्वोत्तम ठरणार आहे. सरकारी नोकरीची संधी चालून येईल. आर्थिक लाभासोबतच शुभ कार्य ठरणार आहे. जुन्या आजारातून तुमची सुटका होणार आहे. मित्र आणि नातेवाईकांसोबत चांगला वेळ घालविणार आहात.

मकर (Capricorn)
या राशीसाठी हा योग भाग्यशाली ठरणार आहे. भौतिक सुखासोबत आर्थिक लाभाचे योग आहेत. प्रत्येक कामात यश मिळले. नशिबाची तुम्हाला साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळणार आहे. कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण असणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!