आंतराष्ट्रीयमहाराष्ट्र

5G पाठोपाठ आता पुढचं लक्ष्य 6G कडे, 1 ऑक्टोबरला होणार मोठी घोषणा

मुंबई ,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आतूरतेनं ज्याची सगळेजण वाट पाहात होते ते 5G ची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. 1 ऑक्टोबर रोजी 5G सेवा लाँच होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते 5Gचं लाँचिंग करण्यात येणार आहे. 5G सुरू होण्याआधीच लोकांचा कल 5G फोन घेण्याकडे अधिक असल्याचं दिसत आहे. याचे प्लॅन कसे असतील याबाबत जून कोणतीही माहिती मिळाली नाही.

ऑक्टोबर महिन्यात ग्राहकांना 5G सेवा वापरण्यासाठी मिळू शकते. रिलायन्स जिओने मेट्रो शहरांमध्ये दिवळीपर्यंत 5G सेवा उपलब्ध करून देऊ असं ग्राहकांना आश्वासन दिलं आहे. ऑक्टोबर महिन्यात साधारण 13 शहरांमध्ये ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

6G तंत्रज्ञानामध्ये जगाचे नेतृत्व करण्याचे ध्येय भारताचं आहे. 4G वरून 5G वर अपग्रेडेशन विक्रमी वेळेत झाले. त्यामुळे आता पुढचं लक्ष्य 6G कडे असणार आहे. त्यामुळे आता 6 जी बाबत मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे.

5G सपोर्ट अशा प्रकारे तपासला जाऊ शकतो?
तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंग्ज ऑप्शनमध्ये जावं लागेल. येथे अनेक पर्याय असतील, त्यापैकी तुम्हाला Connection किंवा Wi-Fi & Network वर क्लिक करावं लागेल. आता यूजर्सला Sim and Network या पर्यायावर जावं लागेल. काही स्मार्टफोनमध्ये हा पर्याय Mobile Networkच्या पर्यायात उपलब्ध असेल.

तिथे तुम्हाला Network Mode पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करून तुम्हाला Preferred Network Type वर जावं लागेल. तुम्हाला येथे 5G नेटवर्कचा पर्याय दिसतो का?जर उत्तर हो असेल तर याचा अर्थ तुमचा फोन 5G नेटवर्कसाठी तयार आहे. आपण इच्छित असल्यास आपण थेट पसंतीचे नेटवर्क प्रकार शोधून ही सेटिंग तपासू शकता.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!