भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

अखेर मंत्रिमंडळ विस्तारचा मुहूर्त ठरला? जळगाव जिल्ह्याला मिळणार तिसरा मंत्री, याना मिळणार संधी

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जूनला सरकारची सूत्र हाती घेतली होती. त्यांनी पदाची सूत्र घेतल्यानंतर मंत्रिमंडळ पहिला विस्तार तब्बल ३९ दिवसांनी झाला होता. त्यानंतर अनेक दिवस खातेवाटपही झाले नव्हते. खातेवाटप झाल्यानंतर दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले होते. कारण मंत्रिमंडळात २८ जागा रिक्त आहेत. परंतु सर्वोच्च न्यायालयात असणाऱ्या याचिकेमुळे विस्तार रखडला होता. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. त्यात शिंदे सरकारला दिलासा मिळाला. यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाली होती. आता विस्ताराचा निर्णय झाला आहे.


शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आता हालचाली सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील मंत्र्यांची यादीही तयार केली आहे. दुसरीकडे भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यांशी चर्चा केली. जे.पी.नड्डा गुरुवारी प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीच्या निमित्ताने राज्यात आले होते. यावेळी त्यांच्यांशी विस्ताराबाबत चर्चा झाली. यामुळे येत्या २३ किंवा २४ मे रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, अशी माहिती मिळतेय.

शिंदे गटाची यादी तयार
शिंदे गटाची मंत्रिमंडळ विस्ताराची यादीही तयार झाली आहे. या यादीत आमदार बच्चू कडू, प्रताप सरनाईक, सदा सरवणकर, चिमणराव आबा पाटील, भरत गोगावले, संजय शिरसाट, यामिनी जाधव यांच्यासह आणखी काही जणांचा समावेश आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिले होते. त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!