भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

अखेर शिवसेना नेते खा. संजय राऊत याना जमीन मंजूर

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सत्र न्यायालयाकडून शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना जामीन मिळाला आहे. मुंबईच्या पीएमएलए कोर्टाने त्यांना जामीन दिला आहे. पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संजय राऊत सध्या आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळ्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या वर्षी जुलैमध्ये अटक केली होती. यानंतर न्यायालयाने संजय राऊत यांचा जामीन अर्ज अनेकवेळा फेटाळला होता. आता त्याला दिलासा मिळाला असून 102 दिवसांनी तुरुंगातून बाहेर येणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!