भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

पाच दिवसांच्या भाववाढ नंतर सोनं झालं स्वस्त, तर चांदीच्या भावात पडझड

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सध्या जागतिक बाजारात मोठी उलथापालथ सुरु असून अमेरिकेने महागाई आटोक्यात आणण्यासाठी कंबर कसल्याने गेल्यावर्षीपासून तिथली केंद्रीय बँक आक्रमक भूमिका घेत आलेली आहे. कच्चा तेलाचे भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेअर बाजार घसरला आहे, या सर्वांचा परिणाम सोने-चांदीच्या किंमतींवर दिसून आला. जागतिक बाजारात दोन्ही धातूंनी नरमाईचा रस्ता धरला. भारतीय सराफा बाजारात गेल्या पाच दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात वाढ होत होती. पण आता दोन्ही धातूंमध्ये पडझड सुरु आहे.

सलग पाच दिवस सोने-चांदीच्या भावात वाढ
जागतिक बाजारात सोने-चांदी घसरणीवर असताना भारतात मात्र त्या उलट चित्र होते. दोन्ही धातूंमध्ये सलग पाच दिवस तेजी दिसून आली. पाच दिवसांत सोने 700 रुपयांनी तर चांदी 1000 रुपयांनी वधारले. पण दोन दिवसांपासून या तेजीला ब्रेक लागला आहे.

सोन्याचे भाव इतके उतरले
गुडरिटर्न्सनुसार, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्यात कमाल करता आली नाही. मध्यात सोन्याने सलग पाच दिवस गती पकडली. 15 आणि 16 सप्टेंबर रोजी सोन्यात प्रत्येकी 200 रुपयांची वाढ झाली. 17 आणि 18 सप्टेंबर रोजी सोने 150 रुपयांनी वधारले. 19 सप्टेंबर रोजी 150 रुपयांनी दर वधारले. 20 सप्टेंबर रोजी मोठा बदल झाला नाही. 21 सप्टेंबर रोजी किंमती 150 रुपयांनी स्वस्त झाल्या. 22 कॅरेट सोने 55200 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,200 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे.

मात्र चांदीत पडझड
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच चांदीत 5000 रुपयांची घसरण झाली. 15 आणि 16 सप्टेंबर रोजी चांदी 1200 रुपयांनी वधारली. तर 18 सप्टेंबर रोजी चांदीत 200 रुपयांची घसरण झाली. 19 सप्टेंबर रोजी चांदी पुन्हा 300 रुपयांनी उसळली. 20 सप्टेंबर रोजी 300 रुपयांनी किंमती घसरल्या. ही घसरण कायम आहे. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 74,500 रुपये आहे.

सोन्याचा भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 24 कॅरेट सोने 59,072 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 58,835 रुपये, 22 कॅरेट सोने 54110 रुपये, 18 कॅरेट 44,304 रुपये, 14 कॅरेट सोने 34,557 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,971 रुपयांपर्यंत झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!