भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयमहाराष्ट्रसामाजिक

मोफत रेशननंतर आता टीव्ही पाहणेही मोफत ! मोदी सरकारचा आणखी एक निर्णय

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। केंद्रातील मोदी सरकार सर्वसामान्यांना अनेक सुविधा पुरवते. मोफत अन्नधान्यापासून घरापर्यंत अनेक गोष्टी मोदी सरकार जनतेला देत आहे. या सोबतच आता सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आता सर्वसामान्यांना डिश टीव्ही मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणीची स्थिती सुधारण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओची स्थिती सुधारण्यासाठी 2,539 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. देशातील दुर्गम, सीमावर्ती आणि आदिवासी भागात राहणाऱ्या लोकांना मोफत डिशची सुविधा दिली जाईल, असे सरकारने सांगितले आहे. या भागातील सुमारे 7 लाख लोकांच्या घरी मोफत डिश बसवण्यात येणार आहे.

या योजनेद्वारे डीटीएचचा विस्तार करण्याची केंद्राची योजना आहे. यासोबतच जुनी स्टुडिओ उपकरणे आणि ओबी व्हॅन पूर्णपणे बदलण्याची योजना आहे. सध्या दूरदर्शनच्या अंतर्गत जवळपास 36 टीव्ही चॅनेल आहेत. त्याच वेळी, यापैकी 28 प्रादेशिक वाहिन्या आहेत आणि आकाशवाणीकडे सध्या सुमारे 500 प्रसारण केंद्रे आहेत.
सरकारने एक प्रसिद्धी पत्रक जारी करून म्हटले आहे की, यामुळे देशातील रोजगारालाही चालना मिळेल. देशभरात टीव्ही, रेडिओसह अनेक क्षेत्रात रोजगार निर्माण होणार असून, त्यामुळे तरुणांना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!