भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

Petrol : केंद्रानंतर राज्याचाही दिलासा, पेट्रोल 2 रुपये 8 पैशांनी तर डिझेल 1 रुपये 44 पैशांची स्वस्त

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शनिवारी केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरात 9.5 रुपयांची तर डिझेलच्या दरात 7 रुपयांची कपात करत सामान्यांना मोठा दिलासा दिला,केली होती. त्यानंतर राज्य सरकारनेही पेट्रोल- डिझेलचे दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने पेट्रोलच्या दरात 2 रुपये 8 पैसे आणि डिझेलच्या दरात 1 रुपये 44 पैशांची कपात केली आहे.

केंद्राच्या अर्थमंत्र्यांनी राज्यांना पेट्रोल-डिझेलवरचा व्हॅट कमी करावा असे आवाहन केले होते. त्यानंतर राजस्थान आणि केरळने आपल्या राज्यात पेट्रोल- डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात केली होती. यानंतर महविकास आघाडी सरकारने आज पेट्रोल-डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक अडीच हजार कोटींचा बोजा पडणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारने कर कमी केल्यामुळे पेट्रोल 11 रुपये 58 पैशांनी स्वस्त झाले आहे. तर डिझेल 8 रुपये 44 पैशांनी स्वस्त झाले आहे. व्हॅट कमी झाल्यानंतर मुंबईत पेट्रोल 109 रुपये 27 पैसे प्रतिलिटर दराने उपलब्ध होणार आहे. सरकारने डिझेलवर 1 रुपये 44 पैसे कमी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे डिझेल प्रति लिटर 95 रुपये 84 पैसे मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!