भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयमहाराष्ट्र

Airtel 5G ‘या’ 116 स्मार्टफोन्सना करेल सपोर्ट,या यादीत आहे का तुमचा फोन?

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। एअरटेलने नुकतीच भारतातील आठ शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. अर्थात, टेलिकॉम ऑपरेटरद्वारे प्रदान केलेली 5G सेवा केवळ 5G सपोर्ट करणाऱ्या डिव्हायसेसवर वापरली जाऊ शकते. अशा परिस्थितीत, कंपनीने 116 हँडसेटची यादी जारी केली आहे जे एअरटेलच्या नेटवर्कवर 5G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट देतात. Apple, Samsung, Xiaomi, Oppo, OnePlus, Realme, Vivo आणि iQoo चे स्मार्टफोन या यादीत आहेत.

एअरटेलने कंपनीने ऑफर केलेल्या 5G नेटवर्कला सपोर्ट करणार्‍या 116 स्मार्टफोनची यादी जारी केली आहे. यामध्ये Apple , Samsung , Xiaomi , Oppo , OnePlus , Realme , Vivo , iQoo , Nothing , Infinix , Motorola , Asus , Google , Honor , Lava , LG , Nokia आणि Tecno चे स्मार्टफोन्स यांचा समावेश आहे.

यापैकी बर्‍याच ब्रँडच्या स्मार्टफोन्सना 5G सक्रिय करण्यासाठी सॉफ्टवेअर अपडेट्सची आवश्यकता असते, जे येत्या काही आठवड्यांत किंवा महिन्यांत रिलीज होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये Apple iPhone 12 आणि त्यावरील, OnePlus 8 सीरीज, Oneplus Nord 2 आणि Oneplus 9R , 18 Samsung Galaxy स्मार्टफोन, 11 Motorola स्मार्टफोन, 7 Asus स्मार्टफोन, Google Pixel 6A , Honor 50 , Lava Agni , LG Wing , Nokia XR20,Pova 5G आणि Tecno चा समावेश आहे.

यासंबंधीची संपूर्ण यादी Airtel च्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. यामध्ये तुम्ही तुमचा स्मार्टफोन देखील शोधू शकता.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात सांगितले की, केंद्र सरकार 2 वर्षांच्या आत देशभरात 5G सेवा कव्हर करण्याचा मानस आहे.

तसेच रिलायन्स जिओनेही घोषणा केली आहे की ते या वर्षीच्या दिवाळीपर्यंत दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई सारख्या अनेक मोठ्या शहरांमध्ये हाय-स्पीड 5G टेलिकॉम सेवा सुरू करणार आहेत. त्यानंतर, कंपनी डिसेंबर 2023 पर्यंत देशभरातील प्रत्येक शहर, तहसील आणि तालुक्यात आपले 5G नेटवर्क विस्तारित करण्याची योजना आखत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!