भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाइन होणार ! उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यात कोरोनाची लाट जवळपास संपली असल्याने सर्व विद्यापीठांतील परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्या. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे आज सोमवारी त्यांनी ऑनलाइन बैठकीत सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

राज्यात आतापर्यंत कोरोनाची लाट होती. मात्र, गेल्या दीड महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत लक्षणीय घट झालेली आहे. त्यामुळे राज्यात शाळा, महाविद्यालयांसह सर्व संपूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता महाविद्यालये ऑफलाइन सुरू असताना, विद्यापीठांद्वारे ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत आहे. याबाबत विद्यार्थी संघटनाही आक्रमक असल्याचे दिसून आले. त्यातून काही विद्यापीठांद्वारे ऑनलाइन परीक्षा घेण्याचे ठरविले. मात्र, आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेऊन परीक्षांचा आढावा घेतला. त्यात त्यांनी सर्व विद्यापीठांमध्ये ऑफलाइन परीक्षा घेण्याबाबत सूचना केली. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

कोरोनाची लाट जवळपास संपल्याने आता सर्व महाविद्यालये आणि शाळा पूर्ण क्षमतेने पूर्ण वेळ सुरू झाल्या आहेत. त्यामुळे परीक्षासुद्धा ऑफलाइन घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. यापूर्वीही परीक्षा ऑफलाइन घेण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सूचक विधान केले होते. त्यानुसार त्यांनी कुलगुरूंसोबत घेतलेल्या ऑनलाइन बैठकीत निर्णय घेतला. पण विद्यार्थी ऑफलाइन परीक्षा घेण्याच्या विरोधात आहेत. त्यासाठी काही ठिकाणी आंदोलनेसुद्धा झाली आहेत.

उदय सामंत यांच्या आजच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता बळावली आहे. कारण शिक्षण ऑनलाइन झालेले असताना परीक्षा ऑफलाइन कशाला, असा त्यांचा सवाल आहे. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांचा उद्रेक बाहेर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!