भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयसामाजिक

महागाईचा आणखी एक मोठा धक्का,१८ जुलै पासून ” या ” गोष्टी महागणार

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महागाईचा सर्वसामान्यांना आणखी एक मोठा धक्का बसणार असून GST परिषदेने घरगुती वापराच्या अनेक वस्तूंवर येत्या १८ जुलैपासून GST लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पॅकेज केलेले आणि लेबल केलेले गव्हाचे पीठ, दूध, चीज, ताक, दही इत्यादी दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (सीबीडीटी) ही शिफारस सोमवारपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पॅकेज केलेले ब्रँडेड दूध उत्पादने महाग होणार आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत या वस्तूंवरील सूट संपवण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर आता वस्तूंवर ५ टक्के दराने जीएसटी लागणार आहे. मात्र, ज्या वस्तू पॅक केलेल्या नाहीत किंवा कोणत्याही ब्रँडमध्ये समाविष्ट नाहीत त्यांना जीएसटीमधून सूट दिली जाईल.

काय काय होईल महाग
प्री-पॅकेज केलेले आणि लेबल केलेले मांस आणि मासे, दही, लस्सी, पनीर, मध आणि धान्य यांच्यावरील जीएसटी सूट आता रद्द करण्यात आली आहे. या वस्तूंवर ५ टक्के दराने जीएसटी लागू होईल.

सोमवारपासून चेक जारी करण्यासाठी बँकांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कावर १८ टक्के जीएसटी आकारला जाईल.

आता ५,००० रुपयांच्या वर असलेल्या रुग्णालयाच्या खोलीसाठी अधिक पैसे मोजावे लागतील. यावर ५ टक्के जीएसटीभरावा लागेल.

मॅप, अॅटलस आणि ग्लोबवर १२ टक्के दराने जीएसटी लागू होईल.

एलईडी लाईट, फिक्स्चर आणि एलईडी दिवे यासाठी तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील. आता यावर १८ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. १२ टक्के जीएसटी होता.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!