बिष्णोई गँगच्या टार्गेटवर आता आणखी एक मोठा नेता, लाखो रुपयांच्या खंडणीची मागणी
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l नुकताच लॉरेंस बिश्नोई या गँगमधील दोघांनी मागील आठवड्यात अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट मध्ये पाच राऊंड फायर करत घरावर दोघांनी गोळीबार केला होता. त्या नंतर या गोळीबार घटनेची जबाबदारी सोशल मीडियाच्या माध्यमातून लॉरेंस बिष्णोई गँगने घेतली.
मुंबई पोलीसानी तातडीने या प्रकरणाचा छडा लावत या प्रकरणी गुजरातमधून विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल यांना अटक केली. त्यांची कसून चौकशी करण्यात आली. ही गँग आता महाराष्ट्रात सक्रीय होऊ लागली आहे. परंतु त्या नंतरही बिष्णोई गँगने आपले उद्योग थांबवले नाहीत. या गँगने बॉलीवूड नंतर राजकीय लोकांना लक्ष करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड याना या गँगने धमकी देत लाखो रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे.
अनेक गुन्हे दाखल असलेला लॉरेंस बिश्नोई हा पंजाबमधील गँगस्टर असून पंजाबी गायक सिधू मूस वाला याची हत्या या गँगने केली होती.सलमान खानचे प्रकरण शांत होत नाही, तोच राजकीय नेत्यांना धमक्या या गँगकडून दिल्या जात आहेत. जितेंद्र आव्हाड यांना बिष्णोई गँगकडून धमकीचा फोन आला आहे. धमकी देणाऱ्याने लाखो रुपयांची खंडणी मागितली आहे. पैसे न दिल्यास, सलमान खान सारखे होणार असल्याचे म्हटले आहे. त्याने आपले नाव रोहित गोदारा म्हटले आहे. हा फोन ऑस्ट्रेलियातून करण्यात आला आहे.