ब्रेकिंग : राज्यात यापुढे परवानगीशिवाय लग्न,प्रसाद वाटप सारखा कुठलाही सामूहिक कार्यक्रम आयोजित करता येणार नाही- अन्न,औषध मंत्र्यांची घोषणा
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मोठी बातमी समोर आली असून असता सामूहिक जेवणाच्या पंगतीवर बंदी आली आहे.. राज्यात आता यापुढे लग्न, वाढदिवस या कार्यक्रमांसह प्रसाद वाटप आणि सामूहिक भोजनदान कार्यक्रमाच्या आयोजनापूर्वी अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. राज्यात यापुढे परवानगीशिवाय कुठलाही अशा स्वरुपाचा कार्यक्रम आयोजित करता येणार नाही. अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी गडचिरोलीमध्ये एका कार्यक्रमात
ही घोषणा केली.
काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम?
आनंदाच्या अथवा दु:खाच्या कोणत्याही प्रसंगी भोजनदान करण्यापूर्वी, प्रसाद वाटप आणि कोणत्याही उत्सवात सामुदायिक स्वरुपात जर भोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करायचे असेल तर परवानगी घ्यावी लागेल. परवानगीशिवाय कोणताही कार्यक्रम आयोजित करात येणार नाही. भोजनादरम्यान अन्नाची गुणवत्ता राखील जावी, आणि विषबाधेसारखे प्रकारे टाळले जावेत यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचं मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हटलं आहे, त्यामुळे आता कोणत्याही सामुदायिक कार्यक्रमांमध्ये अन्नदान करण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागणार आहे. यामुळे अन्नातून विषबाधेसारखे प्रकार टळण्यासोबतच अन्नाची गुणवत्ता राखण्यात मदत होणार आहे.